अवकाशातसुद्धा करू शकता शेती अंतराळवीरांची नवी झेप !

संतुलित आहार आणि स्थानिक अन्न खावे असे नेहमी आपल्याला आपल्या पाल्यांकडून सांगितले जाते पण अंतराळवीरांना दीर्घकाळासाठी अवकाशात राहावे लागते , तेव्हा त्यांनी काय खावे ? म्हणूनच त्यांच्यासाठी खास अवकाशात शेतीची लागवड सुरु करण्यात आली आहे आणि त्याचे प्रयोग पण सुद्धा यशस्वीरित्या पार पाडण्यात आले आहे.

संतुलित आहार आणि स्थानिक अन्न खावे असे आहारतज्ज्ञ नेहमी आपल्याला सल्ला देतात ; त्याच पृथ्वीवर अंतराळवीरांनी अवकाशात असताना तिथेच शेती करून त्या शेतात पिकवलेलं अन्न खाल्लं तर जास्त ठीक राहील असे संशोधकांनी विचार केला आणि निरनिराळे प्रयोग सुरु केलेत.


पृथ्वी आपल्या आईभूमीची निर्मिती झाली आणि नंतर जीवनसृष्टीची निर्मिती झाल्यापासून माणसाला खगोलशास्त्र आणि अंतरालाविषयी कुतूहल वाटत आलेले आहे. आपण माणसाला प्रत्येक वेळी आकाशाकडे बघितल्यावर एक वेगळं दृश्य दिसत असल्यामुळे तो नेहमीचा काहीतरी अद्भुत बघितलं या भावनेने भारावून गेलेला आहे . आकाशाकडे बघतांना कधी निळसर आकाश दिसायचे तर कधी पांढरफट्ट दिसायचे . श्रावण ऋतूत कधी काळे ढग पावसाचे आकाशात दिसायचे तर इतर ऋतूत तेज आणि तप्त सूर्याकडे बघणे अशक्य व्हायचे.रात्रीसुद्धा आकाश वैविध्य दिसायचे ताऱ्यांनी भरलेलं तिल मिल करते पांढरं आकाश दिसायचे तर कधी पौर्णिमेचा चंद्र त्या आकाशात पूर्ण गोल दिसायचा.चंद्रसुद्धा कधी पूर्ण गोल तर कधी अर्धा गोल तर कधी अमावसेत लपून जायचा. इतर ग्रहतारेसुद्धा आकाशात माणसाच्या नजरेने दिसायचे.

कित्येक खगोलशास्त्रज्ञ आकाशाविषयीची ही वैशिष्ट्ये अचंभित होऊन बघण्यात आणि त्या विषयी कविकल्पना करण्यातच घालविली . यावरूनसुद्धा विज्ञानाचे आगमन झालेत आणिआकाशमधल्या या चमत्रकारांना ठराविक नियमांमध्ये बांधण्याची संकल्पना सुरु झाली. यावरून पुढे संशोधन सुरु झाले पृथ्वी गोल आहे आणि ती निरंतर फिरत आहे . या संशोधनासाठी १९५७ साली सोव्हिएत संघटनेनं “स्पुटनिक “नावाचे अंतराळयान अवकाशात सोडले .



पृथ्वीवर आपण सहजपणे करू शकणाऱ्या गोष्टी आपण अंतराळात करू शकतो का?अशा प्रश्नांचा अभ्यास अनेक वैज्ञानिक करू लागले. म्हणून अमेरिकेतल्या ‘नासा ‘ या अंतराळ संशोधनाने “अंतराळात भाज्या पिकू शकतील का?” या विषयात हात घातला. अंतराळवीर अंतराळयानात सुरुवातीला काही तास अंतराळात तर अधिक तास राहून पृथ्वीवर परत येतात . पण कालांतराने तंत्रज्ञनात प्रगती होत गेल्यावर अंतराळवीरांना अंतराळात खूप जास्त दिवस राहून संशोधन करायची गरज वाटू लागली.

पण जास्त वेळ अवकाशात राहण्यासाठी खूप जास्त प्रमाणात अन्न साठवून अंतराळयानात खूप जास्त वेळेपर्यंत कसे ठेवायचे ?. म्हणूनच अंतराळवीरांच्या ‘नटरनॅशनल स्पेस स्टेशन’ या तेव्हाच्या मोहिमेदरम्यान अंतराळात भाज्यांची लागवड करून त्या पिकवण्यासंबंधीचे वीसेक प्रयोग करण्यात आले. यावरून पृथ्वीवर आणि अंतराळात शेतीकरण्याचे फरक शास्त्रज्ञांना लक्ष्यात आले .
माती,पाणी,हवा.बियांचा दर्जा या घट्कांनाबरोबरच आपल्याला माहित नसलेल्या अनेक घटकांचा रोप वाढीमध्ये सहभाग असतो. भाज्यांची लागवड करण्यासाठी ‘व्हेजी ‘ असे नामकरण करण्यात आलेल्या पध्यतीचा वापर करून अंतराळात मोहरी ,कोबी यांच्यासकट अनेक गोष्टींची यशस्वीरीत्या लागवड करण्यात आली.

अंतराळवीरांनी हे अन्न खाऊन बघितले आणि त्यामधले दोष दुर करण्यात आले. चीन देश तर आलुच्या बिया आणि रेशीम कीडा यांना एकत्रितपणे अंतराळात धाडण्याचा प्रयत्न करत आहे. रेशीम किडे या बियांवर प्रक्रिया करून कर्ब् वायू बाहेर टाकतील ,तो कर्ब् वायू वापरून आलू वाढतील आणि ते करत असतांना प्राणवायू बाहेर टाकतील , तो प्राणवायू पुन्हा रेशीम किडे वापरतील अशी या मागची कल्पना आहे. आता अंतराळात पिकवल्या जाणाऱ्या गाजराचा अभ्यास पृथ्वीवर करण्यासाठीच्या हालचाली सुरु आहे.



नासाच्या अहवालानुसार २७ दिवस मानवीहस्तक्षेपाविना अंतराळात भाज्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होताना दिसून आली आहे. आता या जोडीला “अंतराळामधली गाजरं” किंवा पदार्थ काही वर्षांनी आपल्यासमोर आली तर नवल वाटायला नको अशी परिस्थिती आहे. खरोखरच काही दशकांनी रिचर्ड ब्रॅन्सन ,इलॉन मस्क आणि इतर लोकांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या ग्रहांवर मानवी वस्ती झाल्यात तर तिथले माणसं “अन्नाच्या बाबतीत आम्ही स्वयंपूर्ण आहोत ” असे म्हणू शकतील असे वाटायला लागले आहे.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts