गँगस्टर मुख्तार अन्सारी यूपीला रवाना, विकास दुबे सारखं गाडी पलटी करून होणार एन्काऊंटर ?

चंदीगडः उत्तर भारतात सध्या गँगस्टर मुख्तार अन्सारीची जोरदार चर्चा आहे. पंजाबच्या रुपनगर जिल्ह्यातील तुरुंगात कैद गँगस्टर अन्साराली यूपी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अन्सारीला घेऊन यूपी पोलिस रवाना झाले आहेत. अनेक अपराधी प्रकरणे निकाली काढण्यासाठी तो यूपी पुलिसांना हवा आहे.

कोन आहे गँगस्टर मुख्तार अन्सारी:

गँगस्टरपासून ते नेता बनलेला अन्सारी हा अनेक हत्यांच्या प्रकरणांमध्ये पोलिसांना हवा आहे. मूळचा यूपीचा असलेला अन्सारी हा २०१९ मध्ये पंजाबच्या तुरुंगात कैद होता. आता पंजाब सरकारने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अन्सारी याला यूपी सरकारच्या ताब्यात दिलं आहे. अन्सारीला यूपी सरकारच्या ताब्यात द्या, असे निर्देश मार्च महिन्यात सुप्रीम कोर्टाने पंजाब सरकारला दिले होते.


यूपी पोलिसांचे एक पथक पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास सात वाहनांसह रुपनगर पोलिसांत दाखल झाले. इथून रुपनगर तुरुंग हे जवळपास ४ किलोमीटर दूर आहे. पंजाब सरकारच्या गृहविभागाने उत्तर प्रदेश सरकारला या प्रकरणी पत्र लिहिलं होतं. ८ एप्रिलच्या आता अन्सारीला रुपनगर तुरुंगातू न्या, असं पंजाब सरकारने यूपी सरकारला कळवलं होतं.

पंजाब सरकारने अन्सारीला दोन आठवड्याच्या आत रुपनगर तुरुंगातून उत्तर प्रदेशच्या बांदा तुरुंगात पाठवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता. मऊती बसपाचे आमदार अन्सारी याला पंबाजमधून आणण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज पीएसीच्या एका तुकडीसह उत्तर प्रदेश पोलिसांच्या १५० सदस्यांच्या टीमसोबत सोमवारी सकाळी बांदातून रवाना झालो होते.



गँगस्टर मुख्तार अन्सारी याचे social media वर मिम व्हायरल:

अनेक लोक गँगस्टर मुख्तार अन्सारी याची सुद्धा विकास दुबे सारखे एन्काऊंटर होईल अश्याप्रकरचे मिम एकमेकांना पाठवून युपी पोलिस यांना पाठिंबा देत आहेत. त्यातच आता गँगस्टर मुख्तार अन्सारी याच्या पत्निनेही हीच भीती बोलून दाखवली आहे. मागे झालेल्या विकास दुबे याच्या मृत्यू प्रकरणी युपी पोलिसांनी काय केले हे सगळ्या देशाने पाहिले आहे. जरअश्याचप्रकारे पोलीस स्वतःच गुन्हेगारांना मारत राहिलेतर लोकशाहीचे आणि न्यायव्यवस्थेचे भविष्य फार अंधारात असेल. आता या गँगस्टरचे काय होईल ते पुढील काही दिवसांत कळेलच.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts