लॅपटॉप घेताय? ग्राहकांनो या लॅपटॉपच्या स्पेसिफिकेशन कडे ही लक्ष द्या !

लॅपटॉप घेताय? ग्राहकांनो या लॅपटॉपच्या स्पेसिफिकेशन कडे ही लक्ष द्या !
लॅपटॉप म्हणजे नव्या पिढीसाठी उपयोगी असलेली वही,पण त्या त आणखी जास्त गोष्टी सोबतीला असतात. नवीन एडिशन ४ ते १५ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. जाणून घेऊया त्यांची किंमत आणि वैशिष्ट्ये. “HP Chromebook x360 14A “मध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहे. त्याची बॅटरी १४ तासांपर्यंत (HD) आहे. ज्यामुळे ते आजच्या मोबाइल-पहिल्या पिढीसाठी सर्वोत्तम पर्याय बनते. याशिवाय, यात ८१% स्क्रीन टू बॉडी रेशोसह १४-इंचाचा एचडी टच डिस्प्ले आहे. हे ब्राउझिंग परफॉर्मन्स आणि प्रॉडक्टिव्हिटी सुधारते. हे टॅबलेट किंवा लॅपटॉप म्हणून देखील वापरता येते.

स्पेसिफिकेशन समजले पण किंमत किती?

HP Chromebook x360 14a Intel Celeron N4120 ची किंमत २९,९९९ रुपये आहे. HP Chromebook 11” Mediatek Powered ची किंमत २३,९९९ रुपये आहे. HP Chromebook 14 A’ Intel Powered साठी तुम्हाला २७,९९९ रुपये मोजावे लागतील. तर, HP Chromebook 14C” X360 Pen (Intel Powered with latest gen i3) ची किंमत ५६,९९९ आहे. त्याच वेळी, i5 जनरेशनची किंमत ६५,९९९ रुपये आहे.

आजच्या हायब्रीड शिक्षण वातावरणात संगणक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नवीन “HP Chromebook x360 14A” यात. जे, विशेषतः डिजिटल विद्यार्थ्यांसाठी सुधारित परफॉर्मन्सवर लक्ष केंद्रित करून डिझाइन केलेले आहे. शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन कामांच्या गरजा लक्षात घेऊन या लॅपटॉप ची रचना करण्यात आली आहे. उत्तम अनुभवासाठी यात Fanless डिझाइन आहे, म्हणजे तुमचा लॅपटॉप थोडा कमी गरम होईल हे नक्की. तसेच, व्हिडिओ कॉलसाठी, HD कॅमेरा आणि वाय-फाय 5 सपोर्ट आहे. या लॅपटॉप मध्ये ४ GB RAM आणि ६४ GB eMMC स्टोरेज आहे. हे मिनरल सिल्व्हर, सिरॅमिक व्हाइट आणि फॉरेस्ट टील कलर्समध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचे वजन सुमारे १.४९ किलो आहे.
अश्याच टेक अपडेट मिळवण्यासाठी मराठी Shout ला लगेच Facebook आणि Instagram वर फॉलो करा.

 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts