अकरावीतील प्रवेश असा करा सोपा | 11th std College Admission Maharashtra Process 2022

विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे आणि भरलेल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळावा, या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.दरवर्षाप्रमाणे यंदाही दहावीचा निकाल प्रसिध्द होण्यापूर्वी अकरावी ऑनलाईन प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्याचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जाणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले असून विद्यार्थ्यांना येत्या १ मे पासून प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यास उपलब्ध करून दिला जाणार आहे.

मुंबई महानगर क्षेत्र, पुणे- पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रांसह नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने दिले जाणार आहेत. उर्वरित कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश महाविद्यालय स्तरावर दिले जाणार आहेत.

 मग असा राहू शकतो अकरावी प्रवेश अर्ज :

विद्यार्थी,पालक,महाविद्यालयांमध्ये जागृती करणे तारीख १ ते १४ मे २०२२ .  संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग १ भरण्याचा सराव १७ मे ते निकालापर्यंत  नोंदणी व प्रवेश अर्जाचा भाग १ भरण्यास प्रत्यक्ष सुरूवात१७ मे ते निकालापर्यंत महाविद्यालयांनी भरलेली माहिती तपासून व्हेरिफाय करणेदहावी निकालनंतर पाच दिवस अर्जाचा दुसरा भाग भरण्यास मुदतदहावी निकालनंतर पाच दिवस विविध कोट्यातील प्रवेश सुरू राहणारप्रवेशासाठी तीन नियमित फेऱ्या-अकरावी प्रवेशासाठी या वर्षी सुध्दा तीन नियमित फे-या राबविल्या जाणार आहेत. त्यात पहिल्या फेरीसाठी १० ते १५ दिवस, दुस-या व तिस-या फेरीसाठी प्रत्येकी ७ ते ९ दिवस दिले जाणार आहेत. त्यानंतर विशेष फेरी व उर्वरित विद्यार्थ्यांसाठी प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य फेरी ऐवजी वेटिंग लिस्ट पध्दतीचा अवलंब करून प्रवेश दिले जाणार आहेत.

पालकांनो तुमच्या आवडत्या कॉलेजेस ची यादी तयार करा आणि मागल्या वर्षी असलेली गुणवत्ता यादी तपासा, असे केल्यामुळे आपल्याला आपला प्रवेश कुठे होऊ शकतो याची कल्पना येऊन जाईल. अनेक कॉलेज आपल्याला अॅडमीशन करायला मदत करतात त्यांचेही सहकार्य घ्यायला काही हरकत नाही. अश्याच प्रवेश प्रकियांच्या माहितीसाठी आपल्या मराठी Shout ला भेट द्या.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts