नाशिकच्या नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत २२जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. १३ KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता.
अशी घडली घटना:
दुपारी १२ वाजता टॅंकर ऑक्सिजन भरण्यासाठी दाखल झाला. आज टॅंकर आला तेव्हा लीक होत असल्याचं निदर्शनास आले. बारीक छिद्र होते त्यातून ऑक्सिजन लीक होत होता. आंतरराष्ट्रीय कंपनी ‘टाय यो निपोन’ यांच्या माध्यमातून ऑक्सिजन टाकी उभारण्यात आली आहे. टाकीत दुपारी १२ वाजेच्या सुमारास ऑक्सिजन भरला जात होता. त्याचवेळी टाकीला जोडलेल्या पाईपलाईमध्ये दाब वाढला. परिणामी पाईपलाईन जोडणारे नोझल तुटले. फुटलेल्या भागातून ऑक्सिजन बाहेर पडू लागला. क्षणार्धात ऑक्सिजनचे पांढरे लोट हॉस्पिटलबाहेर दिसून आले. रुग्णालय प्रशासनाने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. सुमारे पाऊण तासात गळती थांबवण्यात यश आले. परंतु तोपर्यंत रुग्णांना दिला जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला होता. पाऊण तासानंतर गळती लागलेल्या नोझलची वेल्डिंग करण्यात आली.
स्थानिक प्रशासनाने कळवलं की, नाशिकमध्ये आलेल्या टँकरमधील वॉल्वमध्ये लीकेज असल्याने ऑक्सिजन वाया गेला. या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण माहिती घेऊन परिपत्रक जारी केलं जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
देखभाल करण्याची जबाबदारी कंपनीची आहे. कंपनीला ही माहिती कळवीत असतानाच छिद्र मोठे झाले आणि गॅस गळती वाढली. त्यानंतर मनपाच्या अग्निशमन दलाला आणि पोलिसांना पाचारण करण्यात आलं. नाशिकची अत्यंत दुर्देवी घटना, ११पुरुष आणि ११ स्त्री रुग्णांचा मृत्यू झाला.
मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत जाहीर:
या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे. नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत.
दुर्घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय चौकशी समिती राज्य सरकारने नेमली:
नाशिकमधील दुर्घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय चौकशी समिती राज्य सरकारने नेमली, यात एक आयएएस अधिकारी, इंजिनियर, एक डॉक्टर यांचा समावेश, राज्य सरकार आणि मनपाकडून मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर.