कोण आहे हि स्वतःशीच लग्न करणारी मुलगी ?

 

बदलत्या काळाबरोबर तरुण मंडळी लग्नव्यवस्थे हटके विचार करत आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप, कॉन्ट्रेक मॅरेजनंतर आता सोलो वेडिंगचा ट्रेंड समाजात पसरत आहे. गुजरातमधील २४ वर्षीय तरुणी स्वतःशीच लग्न करणार आहे.क्षमाने सोलो वेडिंग म्हणजेच स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्ये हा पहिलाच एकल विवाह आहे. त्यामुळं सध्या देशभरात याची चर्चा आहे.

ही भारतीय तरुणी करतेय स्वतःशीच लग्न…

गुजरातमधील क्षमा बिंदू हिचं ११ जून रोजी लग्न आहे. तिने लग्नाची एकूण एक तयारी केली आहे. स्वतःसाठी डिझायनर लेंहगा, दागिने, फोटोग्राफर अशी सगळी तयारी तिने केलीये. क्षमा लग्नातले सगळे विधी करणार आहे. सप्तपदी, भांग भरणे, कन्यादान असे सगळेच पारंपारिक विधी क्षमाच्या लग्नात होणार आहेत. मात्र, कोणत्या गोष्टीची कमी असेल ती नवरदेवाची. नवरदेवाच्या गैरहजेरीतच हे लग्न लागणार आहे. मात्र, तिच्या लग्नात जोडीदारच नसणार आहे.

कोणत्याही अटी शर्तीशिवाय स्वतःशीच एकनिष्ठ राहायचं आणि सगळं आयुष्य स्वतः सोबतच काढायचं, अशी सोलो वेडिंगची संकल्पना आहे. लोक अशा व्यक्तींसोबत लग्न करतात ज्यांच्यावर ते प्रेम करतात. पण माझं स्वताःवर प्रेम आहे आणि म्हणूनच मी स्वतःसोबत लग्न करतेय, असंही क्षमा सांगते.

माझे आई- वडिल पुरोगामी विचारांचे आहेत. त्यांनी हसत हसत या लग्नाला परवानगी दिली. व या लग्नासाठी आशीर्वादही दिला. गोत्री मंदिरात तिचे लग्न पार पडणार आहे. लग्नासाठी तिने स्वतःसाठी पाच वचनंही लिहून ठेवली आहेत. इतकंच नव्हेतर, लग्नानंतर ती हनीमूनला देखील जाणार आहे. हनीमूनसाठी तिने गोवा शहर निश्चित केले असून तिथे ती दोन आठवडे राहणार आहे.

स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय का घेतला?

या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणते, मला कधीच लग्न करायचं नव्हतं पण मला नवरी व्हायचं होतं. म्हणूनच मी स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. देशात याआधी कोणी सोलो वेडिंग केलं आहे हे शोधण्याचाही मी प्रयत्न केला. मात्र, मला तेव्हा कोणीही सापडले नाही. मला वाटतं देशात स्वतःशीच लग्न करणारी मी पहिली मुलगी आहे. देशात स्वप्रेम हे उदाहरण देणारी मी पहिलीच मुलगी असेन, असं क्षमा म्हणते.

 

 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts