या पाच गोष्टींमुळे यश आपल्या हातात येईल.

या स्पर्धेच्या युगात कुणाला यश मिळतं तर कुणाला अपयश. अपयश मिळाल्यास नैराश्य येऊन नकारात्मक विचारांची साखळी जणू निर्माण झाल्यासारखी वाटते. न्यूनगंड निर्माण झाल्यास कुठे व्यक्त होण्याची संधी जणु आपण गमावून बसतो. या गोष्टी मुळासकट नष्ट करण्यासाठी काही सकारात्मक गोष्टींचा अवलंब केला पाहिजे. काही अश्या गोष्टी ज्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनास गती मिळेल. असे काही उपाय ज्यामुळे तुम्हाला यशाचं शिखर गाठण्यास कुणीही रोखू शकणार नाही. बघुयात काही साधे आणि सोपे उपाय.

सकाळी लवकर उठणे

यातील पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठणे. होय, जर आपल्याला लवकर उठण्याची सवय असेल तर ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. सकाळी आपल्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा संचारते. आणि ती आपल्या यशस्वी जीवनासाठी फार महत्वाची ठरते. आपण सकाळी लवकर उठत असल्यास याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर, मनावर होतो. आपलं ध्येय्य गाठण्यासाठी रोजची सकाळ ही फार महत्वाची ठरत असते.

मेडीटेशन करणे 

यातील दूसरी गोष्ट म्हणजे मेडीटेशन. होय जर आपण सकाळी लवकर उठून योगासने किंवा मेडीटेशन करण्यास सुरुवात केल्यास शारीरिक आणि मानसिक स्वास्थ बळकट होण्यास मदत होते. राग, चिडचिडेपणा यावर नियंत्रण मिळवता येते. याचा चंगला परिणाम नक्कीच तुमचं यश साध्य करण्यास मदत करेल.

निर्णयक्षमता वाढवणे 

यातील तिसरी गोष्ट म्हणजे निर्णयक्षमता. जर खुप वेळ घेऊन सुद्धा योग्य निर्णय घेतला नाही तर त्याचा आपल्यावर वाईट परीणाम देखील होऊ शकतो. त्यामुळे घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य हे पडताळून बघणे गरजेचे आहे. यासाठी नेहमी शांत चित्ताने दोन्ही बाजू पडताळून पाहाव्यात. नफा किंवा तोटा याचा सारासार विचार केल्यास लवकर आणि योग्य निर्णय घेतल्यास वेळेचा सदुपयोग होतो.

रिस्क घेण्याची क्षमता

यातील चौथी गोष्ट म्हणजे, आयुष्यात कोणतीही  रिस्क घेणे गरजेचे आहे. त्याचा पुढील परिणाम काय होईल याचा अंदाज घेऊन रिस्क घेतल्यास आपला आत्मविश्वास बळकट होईल. आणि हिंमत वाढेल.

सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे

यातील पाचवी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक विचार. सकारात्मक दृष्टिकोन जीवनात फार मोलाचे आहे. आपल्या आयुष्यात ध्येय साध्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे फारच गरजेचे आहे. जर असे  सकारात्मक विचार आपल्या डोक्यात येत असतील तर त्याचा नक्कीच आपल्यावर चांगला परिणाम होईल.

Author: 

प्रिया गोमाशे.

आकाशवाणी निवेदिका, चंद्रपूर.

 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts