1
सर्वप्रथम तुमचे सिम कार्ड ब्लॉक करा. जेणेकरून फोन चुकीच्या हातात गेला असेल आणि तुमच्या बँक तपशील सोबत छेडकाणी केली जात असेल तर सिमवर ओटीपी पोहोचणार नाही.
2
लॅपटॉप किंवा इतर कोणत्याही फोनच्या मदतीने तुम्ही तुमची बँक खातं ब्लॉक करा. जेणेकरून कोणीही तुमच्या खात्याचा गैरवापर करू शकणार नाही. आपण बँकेला कॉल करून खाते बंद करू शकता.
3
फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास बँक खात्यासोबत मोबाईल वॉलेटमधील एक्सेस ब्लॉक करा. कारण तुम्ही ते अनेक ठिकाणी पेमेंटसाठी वापरता त्याचा चोर गैरवापर करू शकतो.
4
तुम्ही सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) पोर्टलद्वारे चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाइल ब्लॉक करू शकता. यासोबतच त्याच्या मदतीने फोन ट्रॅकही करता येतो.
5
जर तुमचा मोबाईल चोरीला गेला असेल किंवा हरवला असेल तर तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवा , जेणेकरून कोणी त्याचा गैरवापर करत असल्यास तुमचे नुकसान होणार नाही.