उन्हाळ्यात मिळणारी काही फळं तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता दुर करतात. त्यामुळे उन्हाळ्यात या फळाचे सेवन करणं आरोग्यासाठी महत्त्वाचं ठरतं.
कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचा मोह होत नाही, अशी एकही व्यक्ती सापडणार नाही. या फळामध्ये 90% पाणी असते
कलिंगड (Watermelon)
उन्हाळ्यात खरबूजाचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. तसेच त्वचेचे आरोग्य चांगले राहते.
खरबूज (Musk melon)
द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते. तसेच रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, ह्रदयविकारांसारख्या समस्यांवर आराम मिळतो.
द्राक्षे (Grapes)
बाजारात फिक्कट हिरव्या रंगाची फळे मिळतात. तसेच अनेक ठिकणी यांचा रंग गुलाबी असतो. या फळामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
पेरू (Guava)
उन्हाळ्यात येणारे सर्वात लोकप्रिय फळ म्हणजे आंबा. “फळांचा राजा’ ही उपाधी लाभलेल्या या फळामुळे उन्हाळा सुसह्य तर होतोच, शिवाय उन्हाळ्यातील उष्णता आंबा पचविण्यास मदत करते.
आंबा (Mango)
गोड चवीचे डाळिंब पित्तशामक असते. उन्हाळ्यात गोड डाळिंबाचा रस तृप्तिकर तर असतोच, पण उष्णतेचे निवारण करण्यासाठीही उत्तम असतो.
डाळिंब (Pomegranate)
या फळांबद्दल आणखी माहिती आणि हेअल्थ टिप्स जाणून घेण्याकरिता वेबसाइट ओपन करा.