जवळजवळ दोन वर्षांनी रेडमी भारतात आपला नवीनतम K-सिरीज स्मार्टफोन लाँच करत आहे, जाणून घेउया Redmi K50i 5G ची किंमत आणि वैशिष्ट्ये.
Redmi K50i हा 6.6-इंचाच्या IPS LCD डिस्प्लेसह येण्याची शक्यता आहे. हा फोन फुल HD+ रिझोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB ची स्टोरेज क्षमता असेल.
Redmi K50i Android 13-आधारित MIUI 13 वर आधारित असू शकतो . तसेच , पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IP53 रेटिंगसह देखील असण्याची शक्यता आहे .
Redmi K50i मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असू शकतो ज्यामध्ये 64MP प्राथमिक सेन्सर तसेच 8MP वाइड-एंगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर असेल . सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 16MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा असू शकतो.