आरोग्याची पॉलिसी देते बरंच काही. नक्की वाचा!

खरंतर पॉलिसीज अनेक प्रकारच्या आहेत. बहुतांश लोकं लाँग टर्म पॉलिसीचे ग्राहक आहेत. परंतु, जेव्हा आरोग्याचा विषय येतो तेव्हा सर्वजण शारीरिक आरोग्या संदर्भातच चर्चा करतात. विमा पॉलिसी घेताना देखील हीच परिस्थिती असते. बहुतांश लोक मानसिक आरोग्याकडे लक्ष देत नाही. मात्र, कोविडकाळात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे लोकांना शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्याचंही महत्त्व समजलं आहे. आता लोक मानसिक आरोग्याबद्दल खुलेपणाने बोलत आहेत. आणि आरोग्याच्या बाबतीत सजग झाले आहेत. 

 

कोविडच्या अगोदर विमा कंपन्या मानसिक आरोग्याबाबत इतक्या जागरुक कधीच नव्हत्या. अलीकडे, विमा नियामक आयआरडीए ने खाजगी विमा कंपन्यांना मानसिक विमा संरक्षण प्रदान करावे असे निर्देश दिले होते. यावर केवळ ५ वर्षांपूर्वी कायदा बनविला गेला आहे. अनेक विमा कंपन्यांनी अद्याप त्याचे पालन सुनिश्चित केलेले नाही. मात्र, आयआरडीएच्या आदेशानंतर यात बदल होण्याची अपेक्षा आहे. विमा घेताना, तुम्हाला त्यात मानसिक आरोग्य कवच मिळत आहे की नाही याकडेही लक्ष दिले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला विमा खरेदी करताना मानसिक आरोग्य कवच का घ्यावे हे सांगणार आहोत. मग चला तर जाणून घेऊयात आरोग्यविमा बाबत महत्वाच्या गोष्टी. 

 

आजकाल महागाईच्या जमान्यात आरोग्याच्या बाबतीत सगळ्यात गोष्टी महाग झाल्या आहेत. खरंतर, मानसिक आजारांवर उपचार महाग आहेत. वैद्यकीय सुविधा सातत्याने महाग होत आहेत. सर्वसमावेशक आरोग्य विमा पॉलिसी वाढत्या महागाईत मानसिक आरोग्य रुग्णांसाठी वरदान ठरू शकते. विमा पॉलिसीचे कवच घेतल्यानंतर उपचाराचा खर्च वाढण्याचा परिणाम तुमच्या खिशावर होणार नाही. ही विमा पॉलिसी अडचणीच्या वेळी आर्थिक मदत करेल. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही पॉलिसी नक्की काढून याचा लाभ घ्या. 

 

हेल्थ चेकअपसाठी कोणत्या सुविधा ? 

 

आजार म्हटलं की पैसा आलाच. आणि पैष्याचं सोंग कधी करता येत नाही. सर्वसमावेशक आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत, विमाधारकाला आरोग्य तपासणी करण्याची सुविधा मिळते. याच्या मदतीने तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यातच कोणतीही समस्या ओळखू शकता. विमा तुम्हाला प्रतिबंधात्मक चाचण्या घेण्यास परवानगी देतो, ज्यामुळे लवकरात लवकर रोगापासून मुक्त होण्यास मदत होते. रोगाचे नंतर निदान झाल्यास तुमच्या खिशावरचा भार वाढू शकतो.

 

शारीरिक आरोग्य आणि पॉलिसी 

 

सर्वसमावेशक आरोग्य विमा पॉलिसीमध्ये तुमच्या शारीरिक आरोग्याचीही काळजी घेतली जाते. यामध्ये विमाधारकाला आजारापूर्वीच त्याची प्रकृती जाणून घेण्यासाठी अनेक सुविधा दिल्या जातात. यामध्ये जीवनशैली रोग निरीक्षण आणि फिटनेस ट्रॅकिंग इत्यादींचा समावेश आहे.

 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts