वाढती कोरोना रुग्नसंख्ये वर लगाम घालण्यासाठी दिल्लीत आता एका हप्त्यासाठी कडकाडी लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. यामुळे दिल्लीतील सामान्य जनता गरजेच्या वस्तूंचा साठा करण्यासाठी गर्दी करत आहे. त्यातच दारू शौकिनानी तर अक्षरशः दारू दुकानासमोर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. त्यात महिला आणि पुरुष दोघेही सोशल डीस्टनसिंग चे पालन न करता जमा झाले आहे. या शौकिनाना ना मास्क ची चिंता आहे ना गर्दिशी त्यातच जेव्हा पत्रकाराने एका महिलेला तुम्ही काबरे गर्दी केली असा सवाल केला तेव्हा तिने अकलेचे तारे तोडून दारू चे महत्व पटवून दिले.
व्हिडिओ झाला व्हायरल:
“मी अनेक वर्षांपासून हाच दारूचा डोस घेत आहे, मला दुसऱ्या कोणत्याही कोरोना औषधाची गरज नाही. दारूत अल्कोहोल असते त्यामुळे ती आम्हा दारूचे सेवन करणाऱ्या मदत करेल” अशी ती ज्ञान पाजळत होती.
आपल्या देशात कशालाही मान्यता देण्यात येऊ शकते फक्त डॉक्टर आणि दवाखाने सांगत असलेले उपाय यांना सोडून. त्यातल्या त्यात या असंख्य घरघुती उपाय यामुळेच अनेक रुग्ण शेवटच्या घटकेला दवाखान्यात जाऊन आपला जीव नाहक घालवत आहेत. काळजी घ्या आणि काही प्रकृतीच्या तक्रारींकडे लगेच डॉक्टरांकडून उपचार करावा अस आव्हाहन मराठी shout ची संपूर्ण टीम करत आहे.