अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरला कन्यारत्न प्राप्त झाले.

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या फॅन्स लोकांसाठी खास बातमी आहे. ती म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना कन्यारत्न प्राप्त झालं.. मुलीच्या आगमनाने कपूर आणि भट्ट कुटुंबात आंनदाला उधाण आलं आहे. ही बातमी आलिया भटने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून दिली आहे. 

 

खरंतर, रविवारी सकाळी जवळपास ७:३० वाजता आलियाला रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. आलिया रुग्णालयात दाखल केल्यानंतर कुटुंबियांनी देखील रुग्णालयात धाव घेतली. यावेळी नवरा रणवीर कपूर सुद्धा होता. 

 

आलिया डिलीव्हरीसाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आल्यामुळे कुटुंब आणि चाहते आनंदात होते.

 

त्यानंतर आलियाने चाहत्यांना ‘गुडन्यूज’ दिली आहे. आता आलिया आणि रणबीरचे चाहते दोघांना शुभेच्छा देत आहेत. सध्या ही आनंदाची बातमी सोशल मीडियावरून प्रचंड वायरल होत आहे. 

 

आलिया मुलगी झाल्याची बातमी विरळ भयानीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिली. पण अद्याप कपूर आणि भट्ट कुटुंबाकडून कोणत्याही प्रकारचा अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु ही आलिया आणि रणवीर यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts