Airtel चे 4 स्वस्त प्लॅन्स लॉंच , महिनाभरात मिळणार तुफान फायदे !

एअरटेल ने आपल्या यूजर्सकरता ४ नवीन स्वस्त प्लॅन लॉन्च केले आहेत. चला तर जाणून घेऊया या चार नवीन प्लॅन्सबद्दल  माहिती :
एअरटेल नेहमी आपल्या यूजर्सकरता अनेक रोमांचक योजना ऑफर लॉंच करीत करते. एअरटेलने आता चार नवीन योजना लाँच केल्या आहेत. यामध्ये दोन रेट-कटिंग प्लॅन्स आणि दोन स्मार्ट रिचार्ज योजना आहेत.

या योजना अशा लोकांसाठी सर्वोत्तम आहेत, ज्यांना जास्त पैसे खर्च करायचे नाहीत. फक्त सिमकार्ड सक्रिय राहण्यासाठी रिचार्ज करायचे आहे. Airtel च्या या नवीन प्लॅन्स ची किंमत 140 रुपयांपेक्षा कमी आहे. सर्वात कमी किंमत 109 रुपये आहे. तर सर्वात जास्त 131 रुपयाचा प्लॅन आहे. 109 आणि रु. 111चा प्लॅन सध्याच्या 99 रु.च्या प्लॅनपेक्षा जास्त वैधता आणि डेटा देतात. चला तर जाणून घेऊया या चार नवीन प्लान्सबद्दल सविस्तर माहिती.

109 रुपयांचा प्लान :

एअरटेलच्या 109 रुपयांच्या रेट कटर प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता मिळेल . हे 200MB डेटा आणि 99 रुपयांच्या टॉक-टाइमसह मिळणार . लोकल, एसटीडी आणि लँडलाइन व्हॉईस कॉलसाठी प्रति सेकंद 2.5 पैसे मोजावे लागतील. तसेच, एसएमएससाठी 1 रुपये प्रति स्थानिक एसएमएस आणि 1.44 रुपये प्रति एसटीडी एसएमएस शुल्क भरावे लागतील.

111 रुपयांचा प्लान : 

एअरटेलच्या या 111 रुपयांच्या स्मार्ट रिचार्जवर तुम्हाला 99 रुपयांचा टॉकटाइम आणि 200 एमबी डेटा मिळेल आणि याची वैधता हे एक महिना असेल. स्थानिक, एसटीडी आणि लँडलाइन कॉलसाठी प्रति सेकंद 2.5 रुपये मोजावे लागतील. स्थानिक एसएमएस करिता 1 रुपये आणि एसटीडी 1.5 प्रति एसएमएस असेल.

128 रुपयांचा प्लॅन :

128 रुपयांचा एअरटेल प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता मिळेल. तुमच्याकडून स्थानिक आणि एसटीडी कॉलसाठी प्रति सेकंद 2.5 रुपये आकारले जातील. मोबाइल डेटासाठी रुपये 0.50/MB शुल्क आकारले जाते.

131 रुपयांचा प्लॅन : 

एअरटेलचा हा 131 रुपयांचा पॅक एका महिन्यासाठी वैध आहे. वापरकर्त्यांना स्थानिक आणि एसटीडी कॉलसाठी प्रति सेकंद 2.5 रुपये आणि राष्ट्रीय व्हिडिओ कॉलसाठी प्रति सेकंद 5 रुपये आकारण्यात येईल. स्थानिक एसएमएसची किंमत 1 रुपये तसेच एसटीडीची किंमत प्रति एसएमएस 1.5 रुपये आहे. याव्यतिरिक वापरकर्त्याकडून प्रति एमबी डेटा 0.50 रुपये आकारले जातील.

 

Anjali Kale: Hello, I am Anjali work as an Editor at मराठीShout News and Entertainment Media
Recent Posts