आशिया चषक स्पर्धेत भारताने आपला विजयी रथ कायम ठेवला असून. हॉंगकॉंगचा भारत संघाने 40 धावांनी पराभव केला आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना १९२ ही मोठी धावसंख्या उभारली होती. या लक्ष्याचा पाठलाग करताना हॉंगकॉंगची टीम १५२ पर्यंतच मजल मारली.
सुर्यकुमार यादव नाबाद ६८* आणि विराट कोहलीच्या नाबाद ५९* अर्धशतकाच्या जोरावर भारताने हॉंगकॉंगसमोर १९३ धावांचं लक्ष ठेवलं होतं.
हॉंगकॉंग वरील विजया सोबतच भारताने सुपर ४मध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
विशेष म्हणजे या सामन्यात विराटला अखेर सूर गवसला. या सामन्यातील विराटच हे ३१ व अर्धंशतक ठरलं.
तर रोहित ने या सामन्यात २१ रन्स करत टी २० इंटरनॅशनल मध्ये ३५०० धावांचा पार करणारा पहिला खेळाळू ठरला.
या विक्रमा बरोबरच आणखी एक विक्रम….
रोहित शर्मा ने आता पर्यंत खेळलेल्या ३७ टी २० इंटरनेशनल मॅच मध्ये भारत संघाचे नेतृत्व केले असून. त्यातील ३१ मॅच मध्ये भारताला विजय प्राप्त झाला. रोहित शर्मा ह्या ३१ व्या विजया बरोबरच सर्वात जास्त टी२० मॅच जिकंण्याच्या यादीत दुसरा भारतीय कर्णधार बनलेला आहे.
विराट ला मागे टाकले.
विराट कोहली ने ५० टी२० मॅच मध्ये टीम इंडिया चे नेतृत्व केले असून त्या मध्ये भारताला ३० मॅच मध्ये विजय मिळवता आला. तर रोहित शर्माने आजच्या ह्या विजया सोबत विराट कोहलीचा रेकॉर्ड मागे टाकत सर्वात जास्त मॅच जिकंण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली असून भारतासाठी सर्वांत जास्त मॅच जिकंण्याचा विक्रम हा महेंद्र सिंह धोनी च्या नावावर असून. धोनीने ने भारतासाठी ४१ टी २० मैच जिकंले आहे . .
टी २० इंटरनॅशनल क्रिकेट मधील भारताचे सर्वात यशस्वी कर्णधार
धोनी – ४१ विजय
रोहित शर्मा – ३१ विजय
विराट कोहली – ३० विजय
टी २० इंटरनॅशनल क्रिकेट मधील रोहीत शर्माचे रेकॉर्ड
१. टी २० इंटरनॅशनल मॅच मधील सर्वाधिक धावा मध्ये क्रमांक १ चा विक्रमवीर
१३४ मॅच ३५२० रन्स.
२. टी २० मध्ये सर्वात जास्त मॅच १३४ खेळण्याचा रेकॉर्ड सुद्धा रोहीत च्या नावावर आहे.
३. भारताकडून टी २० मध्ये सर्वात जास्त शतक ४ नोंदवण्याच्या यादीत रोहीत अव्वल स्थानावर आहे.
४. भारताकडून खेळताना टी २० मध्ये ११८ हि सर्वोच्च धावसंख्या रोहितच्या नावे असून ११७ धावसंख्येसह सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानी.
एकदिवसीय (ODI) इंटरनॅशनल क्रिकेट मधील रोहीत शर्माचे रेकॉर्ड
१. क्रिकेट च्या ODI प्रकारात सर्वाधिक वेळा २०० धावसंख्येचा पल्ला ३ वेळा पार करणारा जगातील एकमेव खेळाळू हा रोहित शर्मा आहे.
२. त्यातील २६४ श्रीलंकेविरुद्ध, २०९ ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि नाबाद २०८* हे श्रीलंके विरुद्ध च्या सामन्यातील आहे.
३. ODI क्रिकेट मध्ये डावातील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या २६४ ही रोहीत शर्माच्या नावे असून हा विश्व् विक्रम
२०१४ साली श्रीलंके विरुद्ध खेळलेल्या गेलेल्या मॅच मधील आहे.