चंद्रप्रकाशात दिसतोय इंद्रधनुष्य ठरलय अविस्मरणीय विषयाची गोष्ट जाणून घ्या सविस्तर!

प्रत्येकांनी आपल्या आयुष्यात इंद्रधनुष्य बघितलाच असेल . सूर्यप्रकाशाचा पावसाच्या पाण्याने विकेंद्रीकरण होऊन तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा असे सात रंग पाहायला मिळतात ज्याला आपण इंद्रधनुष्य असं म्हणतो.पाऊस पडत असतांना तुम्ही इंद्रधनुष्य बघितला असाल पण तुम्ही कधी रात्री चंद्राभोवती इंद्रधनुष्य बघितलात का ?

हा प्रश्न आश्चर्य जनक पण चंद्राभोवती इंद्रधनुष्याची छवी सोशल इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरलेला आहे

 


अल्ब्रेटो पानिझ्झा नामक इटालियन फोटोग्राफर याने आपल्या कॅमेरामध्ये चंद्राभोवतीच्या इंद्रधनुष्याचा हा फोटो घेतला आहे.त्याने हा फोटो रात्री पारमा शहराजवळ असताना काढला आहे. ढगाळ वातावरणात चंद्राभोवती असलेलं हे इंद्रधनुष्य हवेत असलेल्या पाण्याच्या सूक्ष्म कणांमुळे निर्माण झालं आहे. चंद्रप्रकाश हवेत असलेल्या पाण्याच्या अंशामुळे किंवा बर्फाच्या स्फटिकांमुळे विकेंद्रीत होतो आणि सात रंगांचं इंद्रधनुष्य तयार होतं.

पानिझ्झा याने असं सांगितलं आहे कि, मी अनेकदा रात्री असे इंद्रधनुष्य पाहिलं आहे.पण हे दृश्य आतापर्यंत कॅमेरा द्वारे घेता आलं नाही असं तो म्हणतो . कोव्हीड-१९ मुळे झालेल्या ताळेबंदीमुळे सध्या पानिझ्झा घरीच असल्याने त्याने अशाप्रकारेच इंद्रधनुष्य दिसल्यास त्याचा फोटो काढायचा असं ठरवलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खरोखरच पानिझ्झाला हे असं इंद्रधनुष्य घरातून दिसलं. त्याने आधीच कॅमेरापासून इतर आवश्यक गोष्टीची तयारी करुन ठेवल्याने त्याला हे इंद्रधनुष्य कॅमेरात कैद करता आलं.”ढगाळ वातारवण आणि चंद्राचा त्यामध्ये चाललेला लपंडाव यामुळे फोटो काढायला थोड्या अडचणी नक्कीच आल्या.पण रात्री दहा ते १२ दरम्यान सतत थोड्या थोड्या वेळाने चंद्राचे काही शे फोटो काढले “असं पानिझ्झा म्हणतो .पानिझ्झाने काढलेला फोटो खरोखरोच फार सुंदर असून यामध्ये चंद्राभोवती पूर्ण गोलाकृती इंद्रधनुष्य दिसत आहेत.सोशल मीडियावर हा फोटो वायरल होताच अनेकांनी पानिझ्झाची प्रशंसा केली.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts