सायरस मिस्त्री यांची संपत्ती आणि उद्योगक्षेत्रातील गूढ रहस्य जाणून घ्या.

सध्या चर्चेत असलेल्या दिग्गज व्यायसायिक सायरस मिस्त्री यांच्या जाण्याने व्यापार, उद्योग क्षेत्रात मोठा धक्काच बसला आहे. सायरस मिस्त्री यांनी उद्योग जगतात बराच लांबचा पल्ला गाठला आहे. परंतु त्यांची कारकीर्द, त्यांनी उद्योग क्षेत्रात केलेली मेहनत, त्यांचा प्रवास हा बऱ्याच जणांना माहिती नसावा. एक प्रख्यात नावाजलेला उद्योजक आपण गमावला याची खंत आहेच. परंतु ते एवढ्या कमी कालावधीत एवढे मोठे उद्योगपती कसे बनले हे जाणून घ्यायला मात्र कुणाला नाही आवडणार ? तर आज आपण या लेखातून त्यांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणार आहोत. खरंतर मुंबईत ४ जुलै १९६८ रोजी जन्मलेल्या सायरस यांना जवळपास दोन दशकांचा अनुभव होता. सायरस मिस्त्री यांची २०११ मध्ये रतन टाटा यांचे उत्तराधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती. सायरस मिस्त्री, व्यापारी जगतात एक मोठे नाव होते. रतन टाटा यांचा उत्तराधिकारी म्हणून निवड होण्यापूर्वी ते शापूरजी पालोनजी मिस्त्री कंपनीशी संबंधित होते.

 

शापूरजी पालोनजी मिस्त्री कंपनीने मध्ये आशिया आणि आफ्रिकेतील प्रमुख अभियांत्रिकी प्रकल्प पूर्ण केले आहेत ज्यात बांधकाम, वीज प्रकल्प आणि कारखाने आहेत. सायरस मिस्त्री टाटा समूहाचे सहावे अध्यक्ष होते आणि टाटा समूहाच्या इतिहासात फक्त दुसऱ्यांदा टाटा आडनाव नसलेल्या व्यक्तीला कंपनीचे अध्यक्ष बनवण्यात आले. सायरस यांना बांधकाम ते मनोरंजन, इलेक्ट्रिकल आणि आर्थिक व्यवसायांचा दोन दशकांहून अधिक अनुभव होता. ते एक मोठे बिझनेसमन होते.

 

संपत्ती आणि उद्योग क्षेत्रात वाटचाल

 

एकूण संपत्ती ७० हजार कोटींहून अधिक

सायरस मिस्त्री यांचे वडील पालोनजी मिस्त्री हे देखील मोठे उद्योगपती होते. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार पालोनजी मिस्त्री यांनी त्यांच्या मृत्यूच्या वेळी २९ अब्ज डॉलरपेक्षा जास्त संपत्ती कमावली होती, ज्यामुळे ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले होते. मिस्त्री यांनी शापूरजी पालोनजी अँड कंपनी लिमिटेडमध्ये १९९१ मध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी ते २०१२ ते २०१६ या काळात टाटा समूहाचे अध्यक्ष होते. टाटा समूहात सायरस मिस्त्री यांची सर्वाधिक भागीदारी १८.४% होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार सायरस मिस्त्री यांची एकूण संपत्ती सुमारे १० अब्ज डॉलर्स आहे, ज्याची भारतीय रुपयात किंमत ७० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

 

आलिशान बंगला

 

सायरस मिस्त्री त्यांची पत्नी रोहिका छागलासोबत मुंबईत एका मोठ्या आणि आलिशान घरात राहत होते. सायरस मिस्त्री यांची मुंबईशिवाय आयर्लंड, लंडन आणि दुबई येथेही निवासस्थाने आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सायरस मिस्त्री यांच्या नावावर एक आलिशान नौकाही आहे. २०२० च्या व्यवस्थापन विवादापर्यंत सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या खाजगी जेट फ्लीटमध्ये प्रवेश होता.

 

आयर्लंडचेही नागरिकत्व मिळाले.

 

मिस्त्री यांच्याकडे आयरिश नागरिकत्वही होते. तिथे ते भारताचे कायमचे नागरिक होते. त्यांच्या आईचा जन्म आयर्लंडमध्ये झाला, त्यामुळे त्यांना तिथले नागरिकत्व मिळाले. सायरस मिस्त्री यांनी १९९२ मध्ये देशातील प्रसिद्ध वकील इक्बाल छागला यांची मुलगी रोहिका छागला हिच्याशी विवाह केला. सायरस मिस्त्री हे टाटा कुटुंबाशी खूप जवळचे राहिले आहेत. त्यांच्या एका बहिणीचा विवाह रतन टाटा यांचा सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याशी झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून झाले. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले, जिथे त्यांनी लंडनच्या इंपीरियल कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी आणि लंडन बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी मिळवली.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts