Ransomware हल्ल्याचा वाढता धोका.

Ransomware हल्ल्याचा वाढता  धोका. 

कोरोना काळात विशेषतः अनेक जण घरूनच काम करत होते. या काळात डिजिटल साधनांचा वापर सुद्धा वाढला.  

अश्यातच या काळात कोरोनाच्या  लाटे सोबतच आणखी एक नवीनच लाट आली होती.  

जी सायबर हल्ला  “Ransomware Attacks” संबंधी  होती . 

Image Credit : iStock

त्यात डिजिटल युगाला नुकसान पोहचताना दिसले. या बद्दल अनेकांना पुरेशी माहिती नसल्या मुळे अनेक जण बळी पडले. 

अमेरिकन आयटी कंपनी काशिया वर सुद्धा एक मोठा Ransomware हल्ला झाला होता. 

या सायबर हल्ल्यामध्ये काशिया च्या कार्पोरेट नेटवर्क आणि सॉफ्टवेअर वापर करणाऱ्या कमीत कमी १०००   कंपन्यांना टार्गेट केले होते. 

ज्या मध्ये  हॅकर्सनी डेटा वापस करण्यासाठी ७ मिलियन डॉलर्स ची मागणी केली होती. 

Ransomeware च्या माध्यमातून खंडणी वसूल करण्याचे प्रमाण हे २०२१ च्या तुलनेत ५१ टक्क्यांनी वाढलेले असून 

Ransomeware साठी सायबर गुन्हेगारांकडून  मुख्यतः आयटी ,उत्पादन ,आणि वित्त क्षेत्राला टार्गेट केले जात आहे. 

 

याचे नुकसान मोठ्या उद्योगापासून तर डिजिटल माध्यमचा वापर करणाऱ्यावर तरुण-तरुणींना त्यांच्या वापरात  येणाऱ्या संगणकावर नियंत्रण मिळून डेटा चोरून पैसे मागण्याचे प्रमाण वाढत आहे . 

 

काय आहे Ransomware Attacks

Image Credit :- iStock

Ransomware Attack हा एक असा सायबर हल्ला आहे ज्यात एक मेलवेअर व्हायरस कॉम्पुटर मध्ये इंटरनेट माध्यमातून पाठवल्या जातो.

या मध्ये सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणावरून तुमच्या संगणकावर किंवा लॅपटॉप वर नियंत्रण मिळवून डेटा चोरून पैसे मागण्याचे काम करतो. 

पैसे घेण्यासाठी हॅकर युझरच्या सिस्टीम वर एक पॉप-अप करतो  ज्या मध्ये ‘Pay to Unlock’ लिहलेले असते. जेव्हा पर्यंत हॅकर ची गरज पूर्ण होत नाही तो पर्यंत वापरात येणारा कॉम्पुटर सिस्टिम लॉक असतो.

 

Ransomware पासून सुरक्षितता हवी हे उपाय करा.

 

१. अनोळखी व्यक्तीने  एखादी लिंक पाठवली तर तिला ओपन करू नका. 

२. Pop -Up बंद ठेवा. 

 आपल्या वापरात येणाऱ्या कॉम्पुटर आणि स्मार्टफोन च्या वेब ब्राऊजर मधील  setting  वरील Pop -Up ऑपशन ला Block करा. 

३. आपल्या सॉफ्टवेअरला अप  टू डेट  करीत राहा.

 

Ransomware चा हल्ला झाल्यास हे करा. 

 

१. संक्रमित नेटवर्क सिस्टिम ला लगेच डिस्कनेक्ट करा वर ऑफलाईन मोड वर आणा . 

२. एक्सटर्नल स्टोरेज जसे की मेमरी स्टिक, एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह,युसबी  ड्राईव्ह डिस्कनेक्ट करा. 

३. Wi -Fi , ब्ल्यूटूथ, NFC या वायरलेस सिस्टिम डिस्कनेक्ट करा . 

 

Harshal Meshram:
Recent Posts