आयकर विभागाला सापडले महत्वाचे पुरावे ; अनुराग-तापसी कडून तब्ब्ल ६५० कोटींची हेराफेरी .

मुंबई आणि पुण्यात २८ ठिकणी आयकर विभागाचे धाडसत्र सुरु आहे त्यामध्ये काही गोष्टी उघडीस आल्या .

दिग्दर्शक अनुराग कश्यप , अभिनेत्री तापसी पन्नू , दिग्दर्शक विकास बहल आणि मधू मंटेना याच्या पुणे आव मुंबई मधल्या संपत्तीवर आयकर विभागाने बुधवारी छापा टाकलेला होता. आयकर विभागाची कार्यवाही सलग २ दिवस सुरु होती. “फँटम फिल्म्स ” या कंपनीने कर बुडवल्याचा संशय आयकर विभागाला होता त्यामुळे हि कार्रवाही करण्यात आली होती. या कंपनीच्या उत्पदनात तब्ब्ल ६०० कोटीची हेराफेरी झाल्याचे आयकर विभागाला समझले आहे तसेच बॉक्स ऑफिसवर झालेली कमाईत बरीच तफावत आहे असे जाणवले . यावर अधिक माहिती देताना आयक विभागाचे अधिकारी म्हणाले “सुमारे ३०० कोटी रुपयाची तफावत आहे ज्याची प्रोडूकशन हाऊस स्पष्टीकरण देऊ शकला नाही . तापसी पन्नू च्या नावाने पाच कोटी रुपयाची कॅश रिसिप्ट सुद्धा सापडली त्याबाबत पुढील तपस सुरु आहे .” सुमारे ३५० कोटींची करचोरी झाल्याचेही पुरावे सापडल्याचे आयकर विभागाने सांगितले. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून छापेमारीची कारवाई अद्याप सुरूच आहे.


‘फँटम फिल्म्स”:- २०११ मध्ये अनुराग कश्यप, निर्माते-दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने, निर्माता विकास बहल, निर्माते-वितरक मधू मंटेना यांनी ‘फँटम फिल्म्स’ नावाची कंपनी सुरु केली होती. या कंपनीने ‘लुटेरा’, ‘एनएच १०’, ‘मसान’, ‘क्वीन’,’उडता पंजाब’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. होती . मात्र २०१८ मध्ये ही कंपनी बंद करण्यात आली आणि त्यानंतर अनुराग कश्यपने ‘गुड-बॅड फिल्म्स’ तरनिर्माते-दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांनी ‘आंदोलन फिल्म्स’ या नावाने स्वतंत्र वेगळ्या कंपन्या सुरु केल्या. फँटम कंपनी’ने केलेल्या अंतर्गत आर्थिक व्यवहारांची तपासणी आयकर विभागाकडून होत आहे.

बुधवारी मुंबई आणि पुण्यातील २८ ठिकाणी आयकर विभागाने छापा टाकला त्यात रिलायन्स एंटरटेन्मेंट ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिबासिश सरकार, टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वान (KWAN) आणि एक्सीड यांच्याशी संबंधित संपत्तींवर छापेमारीची आयकर विभागाद्वारे कारवाई करण्यात आली. पुढील दोन-तीन दिवस ही कारवाई सुरू राहणार असल्याचं कळतंय.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts