विश्वप्रसिद्ध Iphone आणि Igadgets ची निर्माती कंपनी Apple नव्या वाहन तंत्रज्ञान क्षेत्रात पाऊल ठेवण्याची चर्चा होती. ही चर्चा आता या नवीन वर्षात खरी ठरली आहे.
नूतन वर्षाचा सुरुवातीलाच जगविख्यात कंपनी Apple नव्या वाहन तंत्रज्ञान क्षेत्रात पाऊल ठेवण्याची चर्चा होती. ती आता खरी झाली . आधुनिक कार विद्युत वर चालणारी निर्माण करण्यासाठी ऍपल कंपनी Hyundai मोटर्स कंपनीसोबत करार करणार आहे. Hyundai मोटर्स आता ऍपलच्या कार बनविणार आहे असे ठरले आहे.
ऍपलसोबत या करारामुळे ह्युंडाई कंपनीला आनंदाचा धक्का बसला आहे. २० टक्क्याने ह्युंडाईच्या शेअरमध्ये वाढ बघायला मिळाली आहे. ह्युंडाई कंपनीने सांगितले कि , ऍपलसोबतची चर्चा सुरुवातीच्या टप्प्प्यात आहे . तर दुसरीकडे काही मीडियांनी दावा केला आहे की ,२०२७ मध्ये दोन्ही कंपन्या स्वयं चालक विद्युत कार लाँच करणार आहेत. ऍपल इनसायडरच्या रिपोर्टमध्ये टीएफ सिक्युरिटी ऍनालिस्ट मिंग ची कुओ यांच्या हवाल्याने ह्युंदाई ही सुरुवातीची कंपनी असणार असल्याचे म्हटले आहे. यानंतर ऍपल कंपनी अमेरिकन कंपनी जनरल मोटर्स आणि युरोपियन कार निर्माता कंपनी पीएसए सोबत मिळून कार बनविणार आहे.
ऍपल तर्फे निर्मित पहिली कार ह्युंदाईच्या इलेक्ट्रिक वेहिकल प्लॅटफॉर्म वर बनविणार येणार आहे. Hyundai mobis या कारचे पार्ट डिजाईन आणि उत्पादन करणार आहे. किया जॉर्जियामध्ये रोप उभारणार आहे. जेथे २०२४ पासून १ लाख कारचे उत्पादन घेतले जाणार आहे. ऍपल आणि कियाने ३. अब्ज डॉलरचे करार केल्याचे सांगितले जात आहे.
ह्युंदाईच्या इलेक्ट्रिक वेहिकल प्लॅटफॉर्म २०२० च्या डिसेम्बरमध्ये लाँच केला होता. यावर आधारित नवीन पिढीची बॅटरी इलेक्ट्रिक वेहीकल B. E. V. मॉडेल बनविणार आहे. या प्लॅटफॉर्मच्या कार पाच मिनितांच्या चार्जींगमध्ये शंभर किलोमीटरच्या रेंज मध्ये धावणार आहे. या कारची रेंज ५००किलोमीटर असणार आहे. चार्जिंग क्षमता देखील इतकी असणार आहे कि , अठरा मिनिटांत ८०टक्के चार्जिंग होणार आहे.