Apple iPhone वर लागणार ‘टाटा’चा शिक्का ! लवकरच भारतात तयार होणार आयफोन?

Apple कंपनीच्या आयफोनचा क्रेझ जवळपास सगळ्यांनाच असतो. लहन्यांपासून तर मोठयनपर्यंत सगळ्यांना आयफोन घेणायची इच्छा असते.

आयफोन (iPhone) किंवा अॅपलचे कोणतेही प्रोडक्ट बाजारात लाँच होताच त्याची मागणी प्रचंड वाढते वाढते. आयफोन घेणाऱ्या भारतीयांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली दिसत आहे . टाटा ग्रुप (Tata Group) लवकरच भारतात आयफोन बनवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे. टाटा कंपनी आयफोन ठरवणारी पहिली कंपनी बनू शकते. लवकरच टाटाचा अॅपलसोबतचा करार प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे. येणाऱ्या ऑगस्ट २०२३ पर्यंत यासंबंधी शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आहे . टाटा आणि अ‍ॅपलमधला हा करार प्रत्यक्षात उतरल्यास ही एक मोठी घडामोड ठरणार आहे. कारण आयफोन निर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश करणारी टाटा ही पहिली स्थानिक भारतीय कंपनी ठरणार.

कर्नाटकात स्थायी असलेल्या विस्ट्रॉन कॉर्प या कारखान्याचे अधिग्रहण टाटा ग्रुप करण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर येत आहे. या कारखान्याची किंमत जवळपास 600 मिलियन डॉलर इतकी आहे. इथे जवळपास 10,000 हून अधिक कर्मचारी काम करतात. सध्या इथे iphone 14 या हँडसेडची निर्मिती करण्यात येणार आहे. हा करार जवळपास 5 हजार कोटींचा असल्याची चर्चा आहे. मात्र, अॅपल आणि विस्ट्रॉन कॉर्पकडून अद्याप कोणतीही याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही

दरम्यान, विस्ट्रोनने 2024 पर्यंत कारखान्यातून किमान $1.8 अब्ज किंमतीच्या आयफोन निर्मित करणार आहे . त्यासाठी पुढील वर्षापर्यंत कारखान्यातील कामगारांची संख्या तिप्पट करण्याची योजनासुद्धा आहे. मात्र, विस्ट्रॉन आता भारतातून आयफोन निर्मिती न करण्याच्या विचारात आहे. त्यामुळं टाटाने कारखाना खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र या प्रकरणात टाटा, विस्ट्रॉन आणि अॅपलच्या प्रवक्त्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

अॅपल कंपनीचा आयफोन तसंच इतर डिव्हाइस बनवण्यासाठी भारतात तीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत. यात विस्ट्रॉन, पेगाट्रॉन आणि फॉक्सकॉन यांचा कंपन्यांचा समावेश आहे. मात्र, फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप आणि पेगाट्रॉन कॉर्प या तैवान देशाच्या कंपन्या आहे त्यामुळं भारतात आयफोन बनवल्यास अॅपललाच त्याचा जास्त फायदा होणार.

टाटा हा भारतातील विश्वासनीय ब्रँड आहे. .गेल्या 155 वर्षांपासून टाटा भारतातील तळागाळातील लोकापर्यंत पोहोचला आहे. मीठापासून ते तंत्रज्ञानापर्यंत टाटा वस्तू तयार करते त्यामुळं भारतात जर आयफोनचे उत्पादन होणार असेल तर भारतीयांसाठी ही मोठी गोष्ट असेल.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts