निवृत्तीनंतर भविष्य सुरक्षित करण्यासाठी चांगले नियोजन करावे लागते. त्यासाठी आपण वेगवेगळी गुंतवणुक करत असतो. परंतू एक अशी योजना ज्यामुळे तुमचं जीवन अगदी सुखकर होऊ शकते. बहुतांश लोकांना राज्य व केंद्र शासनाच्या योजनांबाबत फारशी माहिती नसते. त्यामुळे लोकं आपल्या भविष्यकाळातील जिवनाबाबत फारच चिंतित असतात. नेमकी सुरक्षित गुंतवणुक कुठे करावी हे त्यांना माहिती नसतं त्यामुळे बऱ्याचदा सुशिक्षित लोकांची सुद्धा फसगत होतांना दिसते. मात्र एक अशी योजना जी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे भविष्य सुरक्षित ठेवू शकते. ही योजना नेमकी कोणती ? चला तर जाणुन घेऊयात.
हि आहे अटल पेन्शन योजना म्हणजे (APY) ही अशी एक पेन्शन योजना आहे जी (APY) योगदान आणि कार्यकाळावर आधारित परिभाषित पेन्शन देते.
निवृत्तीनंतर भविष्य सुरक्षित करण्यासाठी चांगले नियोजन करावे लागते. अटल पेन्शन योजना (APY) ही अशीच एक पेन्शन योजना आहे, ज्यामुळे निवृत्तीनंतर उत्पन्नामध्ये मदत होते. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आणि त्यांच्या सेवानिवृत्तीच्या बचत करण्यात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. जर तुम्ही देखील या श्रेणीत येत असाल, तर ही योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.
APY म्हणजे काय ?
अटल पेन्शन योजना (APY) योगदान आणि कार्यकाळावर आधारित परिभाषित पेन्शन देते. एपीवाय अंतर्गत निश्चित किमान पेन्शनमध्ये सामील होण्यासाठी किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे आहे. या योजनेंअंतर्गत कोणत्याही सदस्याचा किमान योगदान कालावधी २० वर्षे किंवा त्याहून अधिक असेल. निश्चित किमान पेन्शनच्या लाभाची हमी सरकार देईल.
लाभार्थ्यांना वयाची अट ?
एपीवायमध्ये सामील होण्यासाठी किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे आहे. पेन्शन सुरू होण्याचे वय ६० वर्षे असेल. एपीवाय अंतर्गत ग्राहकाने योगदानाचा किमान कालावधी २० वर्षे किंवा त्याहून अधिक असेल.
सरकार किती योगदान देणार?
– ग्राहकांसाठी निश्चित पेन्शन हमी
– पात्र ग्राहकांना एकूण योगदानाच्या ५० टक्के किंवा १००० रुपयेपैकी जे कमी असेल ते
लाभार्त्यांनी अर्ज कसा करावा ?
या योजनेत अर्ज करण्यासाठी गुंतवणूकदार अटल पेन्शन योजनेचा फॉर्म बँकेत आणि ऑनलाइन दोन्ही ठिकाणी भरू शकतात. एपीवाय खाते सुरू करण्यासाठी ते एकतर कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेला भेट देऊ शकतात किंवा अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करू शकतात आणि संबंधित बँकेकडे स्वत: सबमिट करू शकतात.