सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होणारा अर्शदीप सिंग कोण ?

अर्शदीप सिंग सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल कारण काय ?

 

अर्शदीप सिंग चा ५ जन्म फेब्रुवारी १९९९ मध्ये मध्यप्रद्देश येथील गुना येथे झाला. 

 

७ जुलै २०२२ इंग्लड विरुद्धच्या सामन्यात टी २० इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये पदार्पण केले. या सामन्यात भारताकडून खेळताना ३.३ ओव्हर मध्ये  केवळ १८ धावा देत २ विकेट घेतल्या. आणि विशेष म्हणजे १ ओव्हर निर्धाव सुद्धा दिले. 

 

टी २० मधील आता पर्यंतच सर्वोत्तम प्रदर्शन ३/१२ वेस्टइंडीज विरुद्धच्या सामन्यातील आहे. 

या सीरिज मध्ये ५ सामन्यात ७ विकेट घेत मालिकावीर नावाने सन्मानित झाला. 

 

आणखी वाचा : आशिया कप 2022 : तरच भारत आशिया चषक जिंकेल !

 

अर्शदीप सिंगने भारताकडून खेळताना आता पर्यंत ९ टी २० सामने खेळले असून १३ विकेट घेतल्या आहेत. 

 

अर्शदीप सिंग आतापर्यंत भारत, (अंडर १९. आणि अंडर २३), व आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाकडून खेळला आहे. 

आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाकडून खेळताना ३७ सामने खेळले असून ४० विकेट  त्याच्या नावावर आहेत. 

 

आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाकडून १९ एप्रिल २०१९ ला राजस्थान रॉयल विरुद्ध खेळताना पदार्पणाच्या सामन्यात सुद्धा महत्वाच्या विकेट्स मिळवत २/४३ अशी कामगिरी केली . 

 

आशिया चषक स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला . 

या सामन्यात भारत संघाचा युवा खेळाडू अर्शदीप सिंगकडून चुकीने एक झेल सुटला. 

 

१८. ३ व्या ओव्हर मध्ये  रविबिश्नोई च्या गोलंदाजीवर अर्शदीप सिंगने असिफ अलीचा झेल सोडला. 

व त्यानंतर च्या  १९ व्या ओव्हर मध्ये  पाकिस्तानने १९ धावा केल्या.अलीने या सामन्यात ८ चेंडूत १६ धावा केल्या.

झेल सुटला तेव्हा असिफ अली शुन्यावर होता. 

 

 पण नंतर मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये अर्शदीप सिंग ने कसून गोलंदाजी करत पाकिस्तान ला विजयासाठी ५ व्या चेंडू पर्यंत तड्फवले. 

 

सुटलेला झेल वगळला तर अर्शदीप सिंगने ३.५ ओव्हर मध्ये केवळ २७ धावा देत १ विकेट घेतली. आपली जबाबदारी पार पडली होती. 

Harshal Meshram:
Recent Posts