आशिया कप २०२२ : ठरलंय ! आता पुन्हा भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर संडे होणार.

आशिया कप २०२२ च्या अखेरच्या साखळी सामन्यात पाकिस्तान ने हाँगकाँग वर एकतर्फा विजय मिळवीत. आशिया कप मध्ये पुढील
सुपर ४ च्या टप्यात प्रवेश केला. शारजा मध्ये खेळल्या गेलेल्या पाकिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग च्या सामन्यात हॉंगकॉंग ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजीस आलेल्या पाकिस्तानची सुरवात खराब झाली. संघाच्या अवघ्या १३ धावावरच पाकिस्तानचा कर्णधार बाबर केवळ ९ धाव करून माघारी परतला. नंतर मात्र फलंदाजीस आलेल्या फाकर जमानने रिझवानसह मोठी खेळी करत ५३ धावा केल्या. नंतर मात्र धावांचा पाऊस पाळत कुशदिल ने १५ चेंडूत ५ षटकार सह नाबाद ३५* धावा करीत संघाला खुश केले. या पारीत पाकिस्तान कडून सर्वाधिक धावा नाबाद ७८* रिझवानने करीत कुशदिल च्या मदतीने २० ओव्हर मध्ये १९३ /२ अशी मोठी धावसंख्या उभी केली.

हाँगकाँग ३८ वर गारद !

विजयासाठी १९४ धावांचे लक्ष्य मिळालेल्या हॉंगकॉंग संघाने विशाल धावांचा पाठलाग करताना केवळ ३८ वरच गारद झाला. हा त्यांचा क्रिकेट इतिहासातील सर्वात कमी असा स्कोर राहिला . संघातील एकही खेळाळूने दोन आकडी धावासंख्या सुद्धा गाठली नाही. तर पाकिस्तान कडून सर्वात जास्त विकेट शादाब खान ४
तर मोहमद नवाज ३ , नसीम साह ,२ तर शाहनवाज धानी ने १ विकेट घेत हॉंगकॉंग ला १५५ धावांनी पराभूत केले. सामनावीर मोहमद रिझवान ठरला.
या विजयासह पाकिस्तान सुपर ४ मध्ये दाखल झाला. असून

आणखी वाचा : आशिया कप २०२२ असा रंगणार सुपर ४ सामन्याचा थरार जाणून घ्या कसे…

अ – गटात भारत पहिल्या स्थानावर व पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे .
तर ब -गटात अफगाणिस्तान पहिल्या स्थानावर व श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे. आजच्या विजय सोबतच भारत ,अफगाणिस्तान ,श्रीलंका या नंतर पाकिस्तान हा चौथा संघ ठरला . असून बांगलादेश सोबतच हॉंगकॉंग या संघाचे आशिया कप २०२२ मधील आव्हान संपुष्टात आले आहे .

आशिया कप २०२२ चा सुपर ४ चा टप्पा आज पासून सुरु होत असून सुपर ४ मधील पहिल्या सामन्यात ब -गटातील अव्वल संघ अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील लढत शारजा मध्ये खेळली जाणार आहे. तर सुपर ४ मधील सुपर संडे भारत विरुद्ध पाकिस्तान मध्ये रंगणार आहे .

Harshal Meshram:
Recent Posts