Asia Cup 2022 Time Table :
आशिया कप हा क्रिकेट जगतातील लोकप्रिय टूर्नामेंट पैकी एक आहे. या कप ची सुरवात १९८४ मध्ये झाली.
या बहुचर्चित स्पर्धेत यंदा २०२२ मध्ये एकूण ६ संघ सहभागी आहेत. या संघांची दोन गटामध्ये विभागणी केली असून ती अशी आहे.
अ गट – भारत ,पाकिस्तान ,हॉंगकॉंग
ब गट – श्रीलंका ,बांगलादेश ,अफगाणिस्तान
असा आहे भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
राखीव – दीपक चाहर, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल
महत्वाचे म्हणजे हा आशिया कपचा  १५ वा हंगाम असून तो क्रिकेट प्रकारातील टी २० प्रकारात  दुसऱ्यांदा होत आहे. 
आशिया कप मध्ये सर्वात जास्त वेळ विजेता झालेला संघ हा भारत ७ वेळा हा असून ३ वेळा उपविजेता सुद्धा ठरलेला आहे.
या टूर्नामेंट मध्ये श्रीलंका ५ वेळा विजेता आणि ६ वेळा उपविजेता तसेच भारताचा प्रतिस्पर्धी मानला जाणारा संघ पाकिस्तान हा २ वेळा विजेता आणि २ वेळा उपविजेता ठरला आहे.
या वर्षीं होणारा १५ वा आशिया कप हा यूएई मध्ये होत असून स्पर्धेची सुरवात २७ ऑगस्ट रोजी श्रीलंका आणि अफगाणिस्तान या सामन्यापासुन होत आहे.
तर बहुचर्चित व बहुप्रतीक्षित असलेला भारत व पाकिस्तान हा सामना रविवारी २८ ऑगस्ट रोजी होणार असून स्पर्धेतील अंतिम सामना हा ११ सप्टेंबर ला होत आहे.
आशिया चषक २०२२ वेळापत्रक | Asia Cup 2022 Time Table
| २७ ऑगस्ट | श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान | दुबई | 
| २८ ऑगस्ट | भारत विरुद्ध पाकिस्तान | दुबई | 
| ३0 ऑगस्ट | बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान | शारजा | 
| ३१ ऑगस्ट | भारत विरुद्ध अन्य | दुबई | 
| १ सप्टेंबर | श्रीलंका विरुद्ध बांगलादेश | दुबई | 
| २ सप्टेंबर | पाकिस्तान विरुद्ध अन्य | शारजा | 
| ३ सप्टेंबर | ब १ विरुद्ध ब २ | शारजा | 
| ४ सप्टेंबर | अ १ विरुद्ध अ २ | दुबई | 
| ६ सप्टेंबर | अ १ विरुद्ध ब १ | दुबई | 
| ७ सप्टेंबर | अ २ विरुद्ध ब २ | दुबई | 
| ८ सप्टेंबर | अ १ विरुद्ध ब २ | दुबई | 
| ९ सप्टेंबर | ब १ विरुद्ध अ २ | दुबई | 
| ११ सप्टेंबर | १st Super ४ विरुद्ध २nd Super ४ | दुबई |