साखळी सामन्याचा शेवटचा सामना हा पाकिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग मध्ये खेळला जाईल.
हॉंगकॉंग वर पाकिस्तान ने विजय मिळविल्यास आशिया कप २०२२ मधील पुढील फेरी सुपर ४ मधील सामने असे असतील.
साखळी सामन्यातील गुणतालिकेनुसार आपापल्या गटातील
अव्वल दोन संघाचे सामने होतील.
काल झालेल्या श्रीलंका विरुद्ध बांगलादेश च्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेश वर विजय मिळवीत सुपर ४ मध्ये प्रवेश मिळवला. या सोबतच ब गटातील अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे संघ तर अ गटातील भारत साखळी सामन्यातील दोन्ही सामने जिंकून आधीच सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे .
आणखी वाचा : आशिया कप २०२२ श्रीलंकेची सुपर ४ मध्ये धडक.
तर आज हॉंगकॉंग विरुद्ध पाकिस्तान च्या लढती नंतर ४ संघ कोण असेल हे स्पष्ट होईल.
विशेष म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना आणखी एकदा नव्हे तर दोनदा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
जर पाकिस्तान हाँग काँग संघाला पराभूत करेल तर हे शक्य आहे. त्यानुसार
अ गट- १.भारत २. पाकिस्तान
ब गट -१. अफगाणिस्थान २. श्रीलंका
सुपर ४ मधील सामने असे असतील
३ सप्टेंबर, शारजा
ब १ विरुद्ध ब २: अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका
४ सप्टेंबर , दुबई
अ १ विरुद्ध अ २ : भारत विरुद्ध पाकिस्तान
६ सप्टेंबर , दुबई
अ १ विरुद्ध ब १ : भारत विरुद्ध श्रीलंका
७ सप्टेंबर , दुबई
अ २ विरुद्ध ब २ : पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान
८ सप्टेंबर , दुबई
अ १ विरुद्ध ब २ : भारत विरुद्ध अफगाणिस्तान
९ सप्टेंबर , दुबई
अ २ विरुद्ध ब १ : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
११ सप्टेंबर , दुबई
अंतिम सामना