सामान्य माणूस आता ऑनलाईन व्यवहार कळु लागल्यापासून खाण्याचे पदार्थ, औषधी, कपडे, दागिने, शोभेच्या वस्तू, मोबाईल आणि असंख्य वस्तू आणि सेवा वापरत आहे पण आपल्या औरंगाादमधील लोकांचे शौक काही खासचं आहेत.
कुरिअर ने काय मागवत आहेत औरंगाबादकर ?
काही औरंगाबादकर चक्क चाकू आणि तलवारी यांचे पार्सल मागवू लागले आहेत.औरंगाबादमध्ये कुरियरमधून तलवारी पार्सल येण्याची ही पहिली घटना नाही. गेल्यावर्षी पोलिसांनी कुरियरमधून आलेल्या ५ तलवारी जप्त केल्या होत्या.
कुरियरच्या पार्सलमधून तलवारी आणि कुकरी (नेपाळी लोकांचा चाकू) आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कुरियर कंपनीत जाऊन पोलिसांनी संशयास्पद पार्सल उघडली. तेव्हा या पार्सलमधून तब्बल ३७ तलवारी आणि एक कुकरी निघाली. पोलिसांनी हा सर्व माल तात्काळ जप्त करून चौकशीला सुरूवात केली.या तलवारी पंजाबच्या विविध जिल्ह्यातून डीटीडीसी कुरियरमार्फत औरंगाबादला पाठवण्यात आल्या होत्या.
औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत दराडे सांगतात, “या तलवारी पंजाबच्या जलंधर, अमृतसर आणि इतर शहरातून पाठण्यात आल्या आहेत.”
कुरिअर चा पत्ता आणि नाव यांची माहीत आहे कोडवर्डमध्ये!
पार्सल पंजाबमधून आल्यामुळे पोलीस अधिकारी पंजाब पोलिसांशी संपर्क करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचसोबत पार्सलवर असलेल्या नंबराच्या माध्यमातूनही या तलवारी कोणी मागवल्या त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.या तलवारी पोलिसांनी जप्त केल्या असल्या तरी, या कोणी पाठवल्या आणि कोणासाठी आणि कशासाठी पाठवल्या? याचं कोडं अजूनही पोलिसांना उलगडलेलं नाही.याचं कारण म्हणजे, या पार्सलवर कोड भाषेत नवं लिहिण्यात आली आहेत. “यावर लिहीण्यात आलेली नावं कोडवर्डमध्ये आहेत. जागेचं नावं, व्यक्तीचं पहिलं नाव आणि नंबर आहे,” वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत दराडे पुढे म्हणाले. तलवारी का मागवण्यात आल्या असतील याचा शोध आता पोलीस अधिकारी घेत आहेत.
या शस्त्राचा वापर कश्यासाठी?
या तलवारींचा वापर काय?, असं विचारल्यावर पोलीस प्रशासन असे म्हणाले, “लोकांनी या तलवारी लग्नासाठी, वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्यासाठी किंवा दिखाव्यासाठी विकत घेतल्या होत्या. असं चौकशीत स्पष्ट झालं होतं.”
तलवारी बाबत हे तुम्हाला माहिती आहे का?
प्रामुख्याने पंजाबमध्ये आणि सगळ्या भारतभर शीख धर्मिय लोक तलवारी किंवा छोटा धार्मिक चाकू(कृपाण) बाळगतात. धार्मिक कारणामुळे शीखांना तलवार किंवा कृपाण बागळण्याची कायदेशीर पारवानगी आहे. तसंच देशात इतर व्यक्तींना परवाना असेल तर तलवार बाळगता येते. केंद्र सरकारच्या आर्म्स कायद्याप्रमाणे, तलवार ही शस्त्रांच्या कॅटेगरीमध्ये मोडते. त्यामुळे यासाठी परवाना असणं बंधनकरक आहे. दरम्यान एकदा परवाना मिळाला की दरवर्षी या परवान्याचं नुतनिकरणं करावं लागतं. तुम्ही जर “मराठी shout” चे वाचक असाल तर असे तलवारी घेण्याच्या अजिबात भानगडीत पडू नका .असे आम्ही आवाहन करतो. वाचकांनो केक काय चम्मच ने ही कापता येतो. नुसती तलवार मिविण्याच्या नादात असे करू नका असे आमचे मत आहे.