राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जीवनपरिचय आणि राजकिय प्रवास. | Biography of Droupadi Murmu

द्रौपदी मुर्मू: द्रौपदी मुर्मू मुलांना शिकवायच्या, जाणून घ्या कशा बनल्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती.

स्त्री ही कणखर असते. जीवनात येणारे प्रत्येक चढ-उतार ती खंबीरपणे पार करत असते. हे आपण ऐकत आणि बघत सुध्दा आलेलो आहोत. घरोघरी मातीच्या चुली म्हटल्याप्रमाणे स्त्री ही कौटुंबिक संघर्षाला तोंड देत एकाचे दोन हात करत मार्ग काढतेच. इथेपण एका आदिवासी जमातीतील एका असाधारण महिलेची, तिचं संपुर्ण आयुष्य कायापालट करणारी कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत.

देशाच्या सर्वोच्च पदासाठी म्हणजेच राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला रोजी मतदान होणार होतं. रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आता देशाला नवे राष्ट्रपती मिळू शकणार. भाजपकडे राष्ट्रपतीपदासाठी महिला उमेदवार असताना विरोधकांप्रमाणे यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या महिला उमेदवाराचे नाव द्रौपदी मुर्मू असे होते. द्रौपदी मुर्मू यांनी २४ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. पण भाकीत असे की, जर का भाजपच्या महिला उमेदवार द्रौपदी मुर्मू या निवडणुकीत विजयी झाल्या तर  आदिवासी जमातीतील पाहिल्या महिला आणि भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनतील. कारण याआधी प्रतिभाताई पाटील यांना भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता. पण शेवटी हे भाकीत खरं ठरलं. आणि द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत बहुमत मिळालं आणि त्यांनी २५ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपतीपदाची शपथविधी पार पाडला आणि त्या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या. पण तुम्हाला माहीत आहे का भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोण आहेत? त्यांची राजकिय कारकीर्द काय आहे ? त्यांच्या वैयक्तीक जीवनात कौटुंबिक संघर्ष कोणता होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न गमावता जाणुन घेऊया द्रौपदी मुर्मू यांचा सुरुवातीचा जीवनप्रवास आणि राजकीय कारकीर्द.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जीवनपरिचय | Biography of President Droupadi Murmu

कोण आहेत द्रौपदी मुर्मू ? | Who is Droupadi Murmu

आज राष्ट्रपतीपदावर विराजमान झालेल्या द्रौपदी मुर्मू निवडणूक होण्यापूर्वी मतदानात त्यांचे नाव एनडीएने दिले होते. खरंतर द्रौपदी मुर्मू या ओरिसातील आदिवासी जमातीतील महिला नेत्या होत्या. त्या झारखंडच्या राज्यपाल देखील होत्या.

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म | Birthdate of Droupadi Murmu

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात एका आदिवासी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू होते, ते त्यांच्या परंपरेनुसार गाव आणि समाजाचे प्रमुख होते.

द्रौपदी मुर्मू यांचे शिक्षण किती ? | Education of Droupadi Murmu

द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण त्यांच्या मूळ जिल्ह्यातून पूर्ण केल्यानंतर भुवनेश्वरमधील रमादेवी महिला महाविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून करिअरला सुरुवात केली आणि काही काळ त्यांनी या क्षेत्रात शिक्षिका म्हणून काम केले.

द्रौपदी मुर्मू यांचा जीवन संघर्ष | Droupadi Murmu Earlier Life

द्रौपदी मुर्मू यांचा विवाह श्याम चरण मुर्मू यांच्याशी झाला होता, त्यांना दोन मुले आणि एक मुलगी होती. परंतू द्रौपदी यांचे दोन्ही पुत्र मरण पावले आणि पतीला देखील पंचतत्वात विलीन झाले. मुले आणि पती गमावणे हा द्रौपदी मुर्मूसाठी फारच कठीण काळ होता परंतु त्यांनी हार मानली नाही आणि समाजासाठी काहीतरी करावं ही खदखद मनी दाटून येत होती. आणि म्हणून त्यांनी त्यांनतर समाजकार्य करण्यासाठी राजकारणात प्रवेश केला. परंतु त्यांनी घेतलेला हा निर्णय त्यांचे आयुष्य कायमचे बदलून टाकणारा होता.

द्रौपदी मुर्मू यांची राजकीय कारकीर्द | Droupadi Murmu Political Career

द्रौपदी मुर्मू यांनी ओडिसीमधून भाजपसोबत आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी १९९७ मध्ये रायनगरपूर नगर पंचायतीच्या नगरसेवक निवडणुकीत भाग घेतला आणि विजय मिळवला. त्यानंतर भाजपने मुर्मू यांना पक्षाच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे उपाध्यक्ष केले. आणि यानंतर २००० ते २००२ पर्यंत ओडिशातील भाजप आणि बिजू जनता दलाच्या युती सरकारमध्ये त्या स्वतंत्र प्रभारासह वाणिज्य आणि परिवहन मंत्री झाल्या. पुढे या राजकिय कारकीर्दीत २००२ ते २००४ पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केले. यानंतर ओडिशाच्या रायगंज विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची निवडणूक देखील जिंकली. पुढे इथेच न थांबता त्यांची २०१५ ते २०२१ पर्यंत झारखंडच्या राज्यपालपदीही नियुक्ती करण्यात आली. आणि त्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल झाल्या. त्यानंतर भारताच्या राष्ट्रपती पदासाठी १८ जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर २१ जुलै २०२२ रोजी मतमोजणी झाली. त्यात त्यांना बहुमत मिळाले आणि त्यानंतर २५ जुलै २०२२ रोजी त्यांचा राष्ट्रपतीपदासाठी शपथविधी पार पडला. आणि आज त्या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. आणि मुख्य म्हणजे आदिवासी जमातीतील त्या पहिल्याच महिला राष्ट्रपती आहेत. ही फक्त आदिवासी जमातीसाठीच नव्हे तर संपुर्ण भारतीय नागरिकांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांनी आजवर केलेल्या सामाजिक, राजकीय मोलाचे कार्ये आणि कौटुंबिक संघर्षाचा भार खंबीरपणे उचलणाऱ्या द्रौपदी मूर्मु यांना मानाचा मुजरा.

१) द्रौपदी मुर्मू यांचा जन्म केव्हा आणि कोठे झाला ?

उत्तर : द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात एका आदिवासी कुटुंबात झाला.

2) द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत ?

उत्तर : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत.

3) शिक्षण पूर्ण केल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या करिअरला सुरुवात केली ?

उत्तर : शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून करिअरला सुरुवात केली.

4) कोणत्या कार्यकाळात झारखंडच्या राज्यपालपदी द्रौपदी मुर्मूची नियुक्ती करण्यात आली ?

उत्तर : २०१५ ते २०२१ पर्यंत त्या झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.

5) कोणत्या दलाच्या युती सरकारमध्ये द्रौपदी मुर्मू या स्वतंत्र प्रभारासह वाणिज्य आणि परिवहन मंत्री झाल्या ?

उत्तर : ओडिशातील भाजप आणि बिजू जनता दलाच्या युती सरकारमध्ये त्या स्वतंत्र प्रभारासह वाणिज्य आणि परिवहन मंत्री झाल्या.

संकलन आणि लेखन :

 प्रिया गोमाशे 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts