सावधान ! जर तुम्हीदेखील या कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरत असाल तर होतील गंभीर आजार

सावधान! जर तुम्ही देखील या कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरत असाल तर होतील गंभीर आजार. वाचा सविस्तर.

 

अगदी तुमच्या आमच्या जन्मापासून दीर्घकाळ चालत आलेल्या नावाजलेल्या जॉन्सन बेबी कंपनीने, वेगवेगळ्या नवजात बालकांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रॉडक्टची सेलिंग करता करता फार लांबचा पल्ला गाठला आहे. मात्र आजही काही पालक त्यांच्या नवजात बालकांसाठी त्यांच्या आवडत्या जॉन्सन बेबी या प्रॉटडक्टचा अगदी आवडीने वापर करतांना दिसतात. परंतु काही वर्षाआधी देखील ही कंपनी वादात सापडली होती. परंतु पुन्हा काही दिवसांनी या कंपनीने आपले प्रॉडक्ट विक्री करण्यास सुरूवात केली होती. परंतु आता मात्र जॉन्सन बेबी पावडर बनवणारी कंपनी म्हणजेच जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मोठा झटका बसला आहे. राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने मुलुंड येथील जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनीच्या उत्पादकाच्या उत्पादनाचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे कंपनी आता महाराष्ट्रात जॉन्सन बेबी पावडरचं उत्पादन आणि विक्री करू शकणार नाही. पावडरचे नमुने तपासले असता ते स्टँडर्ड क्वालिटीचे नसल्याचं निष्पन्न झालं आहे. जॉन्सन बेबी पावडरचे नमुने मुलुंड, पुणे आणि नाशिक येथून घेण्यात आले होते. 

 

एफडीएनं जारी केलेल्या प्रेस नोटनुसार जॉन्सन बेबी पावडरचा वापर नवजात बालकाच्या त्वचेला नुकसान पोहोचवणारं ठरू शकतं. एफडीएनं तातडीनं कंपनीला जॉन्सन बेबी पावडरचा स्टॉक बाजारातून परत घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनानं ड्रग्ज अँड अँडमिनिस्ट्रेशन ॲक्ट १९४० नुसार कंपनीला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे. यात कंपनीचा परवाना रद्द करण्याची कारवाई का केली जाऊ नये याचं स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. 

 

यासाठी केला परवाना रद्द

 

लहानग्यांच्या त्वचेस ठरेल अपायकारकजॉन्सन ॲण्ड जॉन्सनची पावडर  प्रामुख्याने नवजात बाळांसाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. साठ्याच्या उत्पादन पद्धतीमध्ये दोष असल्यामुळे उत्पादनाचा सामू (पीएच) हा प्रमाणित मानकानुसार नाही. त्याच्या वापराने नवजात शिशू व लहान मुलांच्या त्वचेस अपाय  होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपरोक्त उत्पादन सुरू ठेवणे हे व्यापक जनहिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही त्यामुळे संस्थेच्या मुलुंड, मुंबई या उत्पादन कारखान्याचा ‘जॉन्सन बेबी पावडर’ या  उत्पादनाचा परवाना १५ सप्टेंबरच्या आदेशाद्वारे कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. 

 

भारतातही प्रंचंड मागणी

 

अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन दीर्घकाळापासून भारतात बेबी पावडरची विक्री करत आहे. कंपनीचे जॉन्सन बेबी पावडर भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय आहे. बहुतेक घरांमध्ये लहान मुलांसाठी ही पावडर मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. भारतात, बेबी पावडर व्यतिरिक्त, कंपनी बेबी शॅम्पू, बेबी सोप आणि बेबी ऑइल देखील विकते आणि त्याला प्रचंड मागणी आहे.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts