WhatsApp वरील या घोटाळ्यापासून सावधान राहा ! अन्यथा एका क्लिकवर होईल तुमचं बँक खातं रिकाम.

सर्वात लोकप्रिय अ‍ॅप्स म्हणजे व्हाट्स अँप ,जवळच्या लोकांशी संवाद साधन्यासाठी आणि त्यांना फोटो, व्हिडीओ किंवा महत्वाचे डॉक्यूमेंट शेअर करण्यासाठी करतो. जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे लाखो युजर्स आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपने आपलं अर्ध काम सोपं केलं आहे. परंतु हे लक्षात घेण्याची गरज की, आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपचे जेवढे फायदे आहेत, तितकेच त्याचे नुकसान  देखील आहेत. ज्याची आपल्याला माहिती नसते.

अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच लोकं व्हॉट्सअ‍ॅपचा आज  वापर करताता, याचाच गैरफायदा घेणून काही लोक WhatsApp  द्वारे लोकांनां लुटतात. 

अलीकडेच एक नवीन घोटाळा समोर आला आहे, ज्याला Rediroff.ru असे नाव देण्यात आले आहे. या घोटाळ्याद्वारे, व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्ते त्यांचे वैयक्तिक आणि आर्थिक माहिती त्यामध्ये भरतात. ज्यामुळे त्यांच्या खात्यातून पैसे देखील गायब झालेले  आहेत. त्यामुळे हा घोटाळा  नेमका काय आहे आणि तुम्ही यापासून तुम्ही स्वतःचे कसे  संरक्षण कराल याबद्दल जाणून घेउया ?

Rediroff.ru घोटाळा काय आहे ?

 

Rediroff.ru हा घोटाळा Linkद्वारे कार्य करतो त्यात लुटणारे  चोर वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर एक लिंक पाठवतात, ज्यावर युजर्स  क्लिक करताच त्यांना त्यांच्या स्क्रीनवर एक नवीन वेबपेज येतो . आणि या वेबपेजवर असे लिहिलेले असते की जर यामध्ये  तुम्ही माहिती  भरल्यास ततुम्हाला मोठे बक्षीस गिफ्ट म्हणून मिळेल. त्या वेबपेज मध्ये तुम्हाला काही प्रशांची उत्तरे लिहायची असतात. 

यामधील प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर, युजर्स ला एक  नवीन वेबसाइटवर नेले जाते जेथे त्यांना त्यांचे नाव, वय, पत्ता आणि बँक तपशील यासारखी माहिती घेतली जाते. आणि नंतर या माहितीचा गैरफायदा घेतला जस्ट आणि ही माहिती  माहिती सायबर चोरांसोबत शेअर केली जाते। 

तुमच्याकडून घेतलेल्या माहितीचे  काय केले जाते ?

 

तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की तुमच्याकडून घेतलेल्या या तुमच्या माहितीचे नेमकं  काय केलं जाते,  तर आम्ही तुम्हाला सांगतो की, या माहितीच्या आधारे  तुमचे बँक डिटेल्स वगैरे घेऊन सायबर चोर तुमच्या नावावर चुकीचे गैर-व्यवहार करू शकतात. 

तुमच्यापासून मिळालेला हा  डेटा ते डार्क  वेबच्या गुन्हेगारांना विकू शकतात आणि  डायरेक्ट तुमच्या खात्यातून देखील तुम्ही पैसे काढू शकतात व त्यामुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसान होउ शकते 

यापासून सुरक्षित राहण्यासाठी काय करायला पाहिजे ?

 

जर तुम्हाला अश्या प्रकारच्या घोटाळ्यापासून लांब राहायचे असेल, तर तुमच्यापर्यंत कोणतीही लिंक आली तर ती काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक आहे  आणि  मगच त्यावर क्लिक करायाला पाहिजे. जर कुठल्याही प्रकारची   स्पॅम लिंक असेल आणि त्यात ‘Rediroff.ru’ दिसत असेल, तर ती स्पॅम म्हणून चिन्हांकित करून  त्या लिंक ला त्वरित हटवा.

जर तुम्ही चुकून  कोणत्याही लिंकवर क्लिक केले असेल तर  ती लिंक त्वरित बंद करायला पाहिजे  आणि अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरच्या मदतीने तुमचा फोन स्कॅन करायला हवे.

जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर असे कोणतेही अ‍ॅप दिसले की, जे तुम्ही डाउनलोड केलेले नाहीत किंवा तुमच्या कुठल्याही उपयोगात नसेल तर , तर ते लगेच तुमच्या स्मार्टफोनमधून डिलीट करा.  

 Rediroff.ru घोटाळ्याबाबत  तुम्हाला अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे , कारण या काळात  ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने संबंधित प्रकरणांमध्ये खूप  वाढ होत आहे . त्यामुळे हे सगळे मेसेज क्लिक करणं आणि मित्रांना शेअर करणं देखील टाळायला हवे आणि कुठल्याही प्रकारच्या अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंक वर क्लिक  करणे टाळावे आणि चुकून क्लिक झाल्यास  स्पॅम लिंक ची पडताडणी करावी.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts