काजू खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का ? मग लगेच घ्या जाणुन

खरंतर काजू आणि काजुपासून बनवलेले पदार्थ सर्वच पदार्थ भारी लागतात. जवळपास काजू खायला अनेकांना आवडतात. काजू आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. काजूचा वापर चवदार आणि गोड पदार्थांमध्ये केला जातो. अनेक डिशमध्ये गार्निशिंगसाठी देखील काजू वापरले जातात. काजूमध्ये प्रथिने, फायबर , झिंक, फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट्स या सारखे पोषक घटक असतात. काजूमध्ये साखरेचे प्रमाण अतिशय कमी असते. तसेच काजूचे सेवन हा निरोगी आणि पौष्टिक आहार मानला जातो. काजूमध्ये कॉपरचा देखील समावेश असतो. शरिरातील रोग प्रतिकारक शक्ती आणि बुद्धीच्या विकासासाठी काजू हा अतिशय उपयुक्त पदार्थ आहे.

 

काजू खाण्याचे फायदे | Health Benefits Of Eating Cashew

 

 

हृदयरोगाला करा बाय बाय : 

Image Credit :- iStock

 

काजूचे नियमित सेवन हृदयासाठी अतिशय उपयुक्त असते. काजूमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते. यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्याशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. काजूमध्ये अँटी इंफ्लेमेटरी घटकांसह जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजे देखील असतात. हे घटक हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

 

मधुमेह असल्यास नक्की सेवन करा : 

Image Credit : iStock

काजूमध्ये इतर नट्सच्या तुलनेत कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते. काजू हे फायबरने समृद्ध असतात त्यामुळे मधुमेहाची लक्षणं कमी करण्यासाठी काजूची मदत होते. काजू रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यास प्रतिबंधित करतात.

 

कोलेस्टेरॉल ठेवतो नियंत्रित  : 

Image Credit : iStock

शरीरातील कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळीमुळे हृदयाचे अनेक आजार उद्भवू शकतात. यामुळे रक्त प्रवाह देखील मंदावतो. अशा वेळी काजूचे नियमित सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. काजूमध्ये असलेले स्टीरिक अ‍ॅसिड रक्तातील कोलेस्टेरॉल देखील नियंत्रित ठेवण्याचे काम करते.

 

डोळे निरोगी ठेवण्यास उपयुक्त : 

Image Credit :- iStock

काजूमध्ये ल्युटिन आणि झेंथिन हे घटक असतात. यामुळे डोळ्यातील पडद्ये सुरक्षित राहतात. त्यामुळे डोळे निरोगी राहण्यास मदत होते. काजूचा आणकी एक महत्त्वाचा फायदा असा की, हा पदार्थ हानिकारक अतिनील किरणांपासून देखील डोळ्यांचे संरक्षण करतो.

 

वेट लॉस करण्यासाठी उपयुक्त :

Weight Loss Women @iStock

 काजूमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडने समृद्ध असतात. काजूमुळे शरीराची पचनसंस्था देखील सुधारते. तसेच वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास काजू हा अतिशय उपयुक्त पदार्थ आहे.

 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts