मेथी पावडरचे हे रामबाण उपाय तुम्हाला माहिती आहेत का ?

हिरवी मेथी आरोग्यासाठी हितकारक असते. परंतु तुम्हाला माहिती आहे का, मेथीचा पावडर देखील दुप्पट गुणकारी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण हे आम्ही नाही तर, आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ही एक अशी पावडर आहे जी, स्वयंपाक करण्यापासून ते घरगुती उपचारांपर्यंत वापरली जाते. मेथी पावडरमध्ये अँटिऑक्सिडंट्, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. प्रथिने, लिपिड, फायबर, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅगनीज, व्हिटॅमिन ‘सी’ आणि ‘बी’ सारखे पोषक घटक मेथी पावडरमध्ये आढळतात. त्यामुळे महिलांना मासिक पाळीवेळी होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. मेथी पावडरमध्ये असलेले व्हिटॅमिन ‘सी’ आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहेत. आज आपण मेथी पावडरचे फायदे जाणून घेणार आहोत

 

स्तनपान करणाऱ्या मातांना उपयुक्त

Image Credit:-iStock

 

स्तनपान करणाऱ्या मातांना मेथी दाण्यांचा नियमित वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे स्तनपानाची प्रक्रिया सुधारते शिवाय मेथीच्या सेवनामुळे शरीरातील एस्ट्रोजेनचे प्रमाण वाढते. यामुळे स्तनाचा आकार वाढवण्यास वाढतो आणि गरोदर मातांच्या स्तनातील दूध वाढण्यासही मदत होते. 

 

वजन कमी करण्यास उपयुक्त

Image Credit:-iStock

 

वाढलेल्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेथी पावडर उपयुक्त आहे. तुम्हाला सुबक, सुंदर आणि स्लीम फिगर हवी असेल तर रोज सकाळी मेथी पावडरचे पाणी प्यायला सुरुवात करा. यामुळे चरबीचे प्रमाण कमी होण्यास सुरु होते आणि स्नायूंच्या विकासास मदत होते. 

 

त्वचेसाठी फार गुणकारी

Image Credit:-iStock

 

पुरुषांच्या तुलनेत महिलांना त्वचेच्या समस्या जास्त असतात. चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग दूर करण्यासाठी मुली वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांचा आणि बाजारातील काही उत्पादनांचा वापर करतात. मात्र बऱ्याचवेळा असे रसायनयुक्त पदार्थ अनेकांच्या त्वचेसाठी हानिकारक ठरण्याची शक्यता असते. शिवाय अशा उत्पादकांमुळे स्कीनला साईड इफेक्ट्स दिसू शकतात. अशा परिस्थितीत मेथी पावडर हा या समस्येवर रामबाण उपाय ठरू शकतो. 

 

मासिकपाळी दरम्यान उपयुक्त

Image Credit:-iStock

 

स्त्रियांमध्ये मासिकपाळी दरम्यान, वेदना, जळजळ आणि अस्वस्थता ही समस्या सर्रास असते. अनेक महिलांना या दिवसांत अशक्तपणा, थकवा जाणवतो. यामुळे पोटात असह्य वेदना, अशक्तपणा आणि थकवाही येतो. अशावेळी तुम्हाला मेथीच्या दाण्यांपासून आराम मिळू शकतो.

 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts