पपई खाल्ल्याने काय फायदे होते जाणून घ्या सविस्तर | Benefits of papaya


प्रत्येकाने दिवसातून एक तरी फळ खावे असे डायटीशियन नेहमी सांगत असतात मात्र प्रत्येक सिझनमध्ये मिळणारी फळे ही आरोग्यासाठी फायदेशीर असतात.फळे आरोग्यासाठी चांगली असतातच पण या फळांचे आरोग्यासाठी असणारे विशिष्ट फायदे आपल्याला माहिती नसते.

गर्भवती महिला ,मधुमेह किंवा इतर कोणतेही विकार असणाऱ्यांनी फळे खाताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे
पपई उष्ण असल्याने ती थंड वातावरणात खावी किंवा ती त्वचा नितळ होण्यासाठी चांगली असते अशा काही गोष्टी आपण ऐकत असतो मात्र त्याचे होणारे फायदे जाणून घेतल्यास हे फळ खाणे का आवश्यक आहे हे समजणे सोपे होईल .

जवळपास सर्व सिझनमध्ये मिळणाऱ्या पपईचे आरोग्याला होणारे फायदे आपण बघूया :



१. पपईमुळे व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते. प्रतिकारक शक्ती चांगली असल्यास कोणताही आजार झाल्यावर त्यापासून लवकरात लवकर बरे होण्यास मदत होते


२. अनेकदा आपल्याला अवेळी भूक लागते मात्र पपईने या भुकेवर नियंत्रण मिळविणे शक्य होते त्यामुळे वजन कमी करण्यास पपई उपयुक्त ठरते.


३. दिवसभराच्या धावपळीने व कामामुळे आपल्याला बऱ्याचदा थकल्यासारखे जाणवते. अशावेळी वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास आलेला थकवा कमी होण्यास उपयुक्त ठरते .




४. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ‘अ’ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते व पपईमध्ये जीवनसत्त्व ‘अ’चे प्रमाण मुबलक असते त्यामुळे वयानुसार दृष्टी कमी होण्याची समस्या उद्भवू नये यासाठी पपई खावे.

५. पपईचे काप खाल्ल्यास त्वचेसंबंधीत तक्रारी दूर होतात.

६. जेवणाची वेळा बदलल्याने , काही कारणांनी बाहेरचे खाल्लयने किंवा वातावरणातील बदल यांचा शरीरावर परिणाम हॉय्यो त्यामुळे पचनशक्तीवर परिणाम होतो मात्र पपई खाल्ल्यास पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts