विमानातील हरविलेल्या लगेज ला शोधण्यासाठी इंजिनियर ने केले विमान कंपनी ला हॅक!!!

हॅकिंग ही काही नवीन बाब नसून आपण या हॅक केले म्हणजे आपले बँक खाते किंवा मोबाईल यांना नुकसान होत हेच आपल्याला ठाऊक.पण एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाने चक्क विमान कंपनी चे खाते हॅक केले आहे. नंदन कुमार नावाच्या या इंजिनियर ने आपल्या पाटणा ते बंगलोर येथील प्रवासादरम्यान आपले लगेज आपल्याच सहप्रवासी यांच्या बरोबर विमान कंपनीच्या चुकीने अदलाबदल झाले. इंडिगो एअरलाइन्स ला वारंवार पाठपुरावा करून ही त्यांनी या अबला तरुणाला मदत करण्याचे नाकारले. या सगळ्या प्रकारामुळे नंदन याने हे प्रकरण आपल्या हातात घेण्याचे ठरविले.

ट्विटर वर प्रतिक्रिया देताना नंदन यांनी सांगितले की, प्रवास संपवून ते जेव्हा घरी आले तेव्हा त्यांच्या पत्नीच्या असे लक्षात आले की आपल्या बॅगांची अदलाबदल झाली आहे. अनेक वेळा पाठ पुरावा करूनही कस्टमर केअर वाले त्यांची केअर न करू शकले यामुळे हतबल होऊन शेवटी नंदन यांनी थेट इंडिगो ऐरलाइन्स यांची सिस्टीम हॅक केले.

या भन्नाट हॅकिंग मुळे नंदन यांचे हरवीलेले लगेज तर परत मिळालेच पण त्यांनी इंडिगो च्या सिस्टीम मधील यांत्रिक त्रुटी ही शोधून काढली. विमान कंपनीने नंदन यांची माफी मागितली असून आपल्या त्रुटी आता त्या दुरुस्त करण्यात येतील असे कळते.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts