सावधान! बाजारात विकल्या जात आहेत बनावटी काजू. कसे ओळखाल ? वाचा सविस्तर.

हिवाळ्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स खूप खात असतो शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आपण काजू देखील नित्यनियमाने खात असतो परंतु बाजारात बनावटी काजू विकल्या जात असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत आहेत होय हे धक्कादायकच आहेत परंतु खरं आहे परंतु बनावटी काजू आपल्याला ओळखता येईल का ? तुमच्या घरी जे काजू आहेत ते बनावटी तर नाहीत ना ? बनावटी काजू कसे ओळखावे ? त्याचा आरोग्यावर काय परिणाम होईल ? या सर्व महत्वपूर्ण प्रश्नांची माहिती आजच्या लेखातून तुम्हाला दिली जाणार आहे.

 

बाजारात भेसळयुक्त काजू विकल्या जात असल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांकडून आले असतील. खरंतर नफा मिळवण्यासाठी भेसळयुक्त काजू विक्रेते विकत आहेत. तुमच्यापैकी अनेकजण बनावट काजू खात असतील. तुम्हाला आता घरच्या घरी बनावट आणि असली काजू कोणता समजू शकते. 

 

बनावटी काजू कसे ओळखाल ? 

 

१) काजूचा रंग पाहून तो बनावट आहे की असली ते समजते. खऱ्या काजूचा रंग पांढरा तर बनावट काजूचा रंग पिवळा असतो. पिवळे दिसणारे काजू हे रंग वापरून तयार केले जातात.

 

२) बनावटी काजू हे खूप हलके असतात. त्याचा दर्जा हातात घेतल्यावर समजून येतो. जेव्हा तुम्ही काजू खरेदी करता तेव्हा त्याची गुणवत्ता निश्चितपणे तपासा. असली काजू दर्जेदार असून ते 1 इंच लांब आणि जाड असतात. तर बनावट काजूच्या आकारात खूप फरक असतो. तसेच बनावटी काजू हे चवीला गोडसर असतात.

 

३) एवढेच नाही तर तुम्ही काजूच्या वासावरून ते असली आणि बनावट ओळखू शकता. असली काजूला संधि आणि भिणीचा सुगंध येतो. तर नकली काजूचा वास घेतला तर त्याचा तेलासारखा वास येतो. असली काजू खाताना ते दातांना अजिबात चिकटत नाही. रसेच तुम्ही नकली काजू खाल्ले तर ते दातांमध्ये सहज चिकटतात. खरे काजू चावायला जड जात नाही सहजरित्या अगदी सॉफ्टरित्या आपण त्यांना चाऊ शकतो. 

 

नकली काजूचे आरोग्यावर परिणाम

 

नकली काजू कसे ओळखावे हे आत्ताच आपण बघितले आहे. आता बघुयात नकली काजूचे सेवन केल्याने खरचं आपल्या आरोग्यावर परिणाम पडतो का ? 

 

खरंतर, नकली काजूचे सेवन केल्यास आपल्या पचन संस्थेवर परिणाम होत असतो. सोबतच गळ्यात खवखवल्यासारखे वाटते. 

 

नकली काजू खाल्यास त्याचे कोणतेही चांगले परिणाम न पडता उलट वाईट परिणाम शरीरावर पाहायला मिळते. नकली काजुला दिलेल्या रंगाचा शरीरावर किंचित प्रतिकूल परिणाम पाहायला मिळतो.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts