सावधान ! तुमच्या फेसबुक अकाऊंटवरून १ डिसेंबर पर्यंत पोस्ट होऊ शकतात डिलीट. करा फक्त एवढे काम.

तुमचे फेसबुक अकाउंट आहे का आहे ? जर असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर फेसबुक युजर असाल तर तुम्हाला देखील तुमच्या प्रोफाईलवर एक मेसेज आला असेल. तो असा की येत्या १ डिसेंबर पर्यंत तुमच्या फेसबुक अकाऊंटवरील काही रिल्स, व्हिडिओज, काही फोटो रीमुव्ह करत असल्याचा मेसेज अनेकांना फेसबुक वर आला असावा.

 

तुम्हाला जर का असा मेसेज आला असेल तर हा मॅसेज पूर्णपणे खरा आहे. होय ! त्यामुळें जर तुम्हाला तुमचे फोटो, व्हिडिओज, रिल्स आणि बऱ्याचश्या पोस्ट्स जर जतन करून ठेवायच्या असतील तर ही पोस्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. परंतु तुम्हाला आता याकरिता तुमच्या फेसबुक अकाऊंट मध्ये जाऊन सेटिंग मध्ये काही बदल करावे लागतील. मग चला तर आपले बहुमूल्य वेळ न घालवता करूयात पुढील ट्रिक्स आणि टिप्स फॉलो. आणि टप्या-टप्याने जाणुन घेऊयात या सेटिंग्जच्या महत्वपूर्ण बाबी. 

 

सर्वातप्रथम तुमच्या फेसबुक अकाउंटच्या Settings मध्ये जाऊन  Settings and privacy मध्ये जा. त्या नंतर तुम्हाला खाली Download your information असे ऑप्शन दिसेल. त्याला क्लिक करा. त्यानंतर Request Copes सोबत Available Copes असे दोन ऑप्शन दिसतील. त्यात Request Copes ला क्लिक करून सिलेक्ट ऑल करा. त्यानंतर खाली क्रिएट फाईलवर क्लिक करा. त्यानंतर Available Copes मध्ये जाऊन एकदा चेक करा. तुमच्या सगळ्या पहील्या पासून ते लास्ट पोस्ट असलेल्या फाईल्स तिथे तुम्हाला Pending म्हणून दिसतील. याचा अर्थ असा की, तुम्हीं तुमची माहिती क्रिएट होणार आहे. आणि जेव्हा तुमची क्रिएट केलेली कॉपी कंप्लीट होईल तेव्हा त्या सगळ्या फेसुकवर पोस्ट केल्या फाईल्स तुम्ही त्या डिवाइस मधून परत डाऊनलोड करून घ्यायची आहे. याबाबतीत तुम्हाला Facebook मध्ये नोटिफिकेशन सुध्दा येईल. त्यामुळे आता गोंधळून न जाता ही सेटिंग आपण करू शकता. आणि अश्याप्रकारे आपण आपले फेसबूकवरील पोस्ट Removed होण्यापासून वाचवू शकता.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts