सावधान ! केशरात होतेय भेसळ. खरी केशर कशी ओळखाल ? जाणून घ्या हे उपाय.

मसाला दुध म्हटलं की हौशी लोकं आवडीने अनेक गोड पदार्थात केशर (Saffron) घालतात. केशर महाग असले तरी त्याची मागणी मात्र बरीच आहे.(Saffron) केशराचे अनेक फायदे आहेत. परंतू आता केशर (Saffron) खरी आहे की खोटी हेच ओळखण कठीण झालंय. काही केशर (Saffron) हौशी मात्र हे पडताळून न बघताच त्याचा अनेक पदार्थात समावेश करतात. पण कधी एवढे पैसे खर्च करून आणलेलं केशर (Saffron) खरोखरंच शुद्ध असेल, याची काही खात्री नाही. म्हणूनच तर केशराची (Saffron) शुद्धता तपासण्यासाठी या काही टिप्स.

 

सणावाराचे दिवस सुरू झाले की घरोघरी हमखास गोड पदार्थ तयार केले जातातच. गोड पदार्थांचा स्वाद वाढविण्यासाठी मग त्यात मोठ्या हौशीने केशर(Saffron) टाकलं जातं. केशर खरंतर खूप महाग मिळतं. पण तरी आपण मोठ्या उत्साहात ते आणतो आणि बऱ्याच गोड पदार्थात अगदी आवर्जून टाकतो. आपल्यालाही मग महागडं, पौष्टिक खाल्ल्याचं आणि खाऊ घातल्याचं समाधान मिळतं. पण एवढ्या हौशीने आणि एवढे पैसे खर्च करून आणलेलं केशर (Saffron) खरोखरंच शुद्ध असेल, याची काही खात्री नाही. म्हणूनच तर केशराची (Saffron) शुद्धता तपासण्यासाठी या काही टिप्स..

 

नकली केशर(Saffron) कशाचे तयार होते?- मक्याच्या कणसाचे जे तंतू असतात, त्याला खाण्याचे रंग लावून त्यापासून नकली केशर(Saffron) बनविले जाते आणि ते अगदी खऱ्या (Saffron) केशराच्या किमतीत विकले जाते. 

 

– केशराच्या (Saffron)काड्या दुधात किंवा गोड पदार्थात टाकल्या की सुवास येतो. आपण त्या सुवासाला भुलतो. पण ज्याप्रमाणे मक्याच्या तंतुंना लाल- केशरी(Saffron) रंग लावला जातो, त्याप्रमाणेच त्याला आर्टिफिशियल इसेन्सही लावला जातो. त्यामुळे मग भेसळयुक्त केशराचा अगदी खऱ्या (Saffron) केशराप्रमाणे किंबहुना त्यापेक्षाही अधिक सुवास येतो.

 

खरे केशर कसे ओळखाल ?

 

केशर(Saffron) मधली भेसळ ओळखण्यासाठी ५ सोपे उपाय आहेत. घरच्याघरी तुम्ही ही चाचणी घेऊ शकता.

 

१. गरम दुधात जेव्हा आपण केशर(Saffron) टाकतो, तेव्हा जर केशर(Saffron) खरे असेल तर त्याचे तंतू तुटत नाहीत. पण नकली केशर (Saffron) असेल तर त्याचे तंतू काही वेळाने तुटून जातात.

 

२. असली केशर (Saffron)  जे असते ते दुधात टाकल्यानंतर हळू- हळू रंग सोडते. त्याउलट नकली केशर (Saffron) टाकल्यावर अवघ्या एका मिनिटाच्या आतच दुधाचा रंग बदललेला दिसतो.

 

३. असली केशर (Saffron) टाकल्याने दुधाचा रंग सोनेरी किंवा अगदी हलका पिवळसर येतो. पण नकली(Saffron) केशरामुळे दुधाचा रंग गर्द पिवळा किंवा क्वचित प्रसंगी तर लालसर, केशरी (Saffron) देखील असतो. 

 

४. केशरला (Saffron)  एक वेगळाच उग्र वास असतो. ज्यावेळी तुम्ही सोविनयर शॉपमधून त्याची खरेदी करता त्यावेळी तुम्हाला ही गोष्ट अगदी नक्कीच जाणवेल. 

 

५. थोड्याश्या पाण्यामध्ये चिमुटभर बेकिंग पावडर मिसळावी आणि त्या पाण्यामध्ये (Saffron) केशराच्या दोन काड्या घालाव्यात. जर या पाण्यामध्ये केशराचा (Saffron) गडद भगवा रंग दिसून येऊ लागला, तर केशर (Saffron) नकली असल्याचे ओळखावे. केशर (Saffron) अस्सल असेल, तर बेकिंग पावडर मिश्रित पाण्यामध्ये त्याचा रंग पिवळा दिसून येईल.

 

केशरचे (Saffron) फायदे भरपूर आहेत. केवळ खाद्यपदार्थांना रॉयल लुक आणण्यासाठीच नाही तर त्याचा उपयोग हा वेगवेगळ्या पद्धतीने होतो.  अनेक सौंदर्यप्रसाधानात केशराचा (Saffron) उपयोग केला जातो. केशर (Saffron) मध्ये अँटी- एजिंग आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचा आणि आरोग्यासाठी ते फारच लाभदायी ठरते. आता या पुढे कधीही  (Saffron) केशरच खरेदी करायला जाणार असाल तर या काही गोष्टींचा विचार नक्की करा. 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts