भगवंत मान यांचा जन्म संगरुर येथे झाला.त्यांचे वडील स्कूल टीचर होते. वयाच्या 18 व्या वर्षी बीकॉम करत असताना त्यांनी त्यांचे पाहिले कॉमेडी कॅसेट काढले.
उत्तर प्रदेश मध्ये ज्या पद्धतीने राजू श्रीवास्तव होते तसेच पंजाब मध्ये भगवंत मान असत.
पूर्वी कॉमेडी चा खास असा कोणताही कार्यक्रम नसत, त्यावेळी भारतात प्रथमतः दि ग्रेट इंडियन कॉमेडी क्लब या नाटक खास करून फक्त स्टँड उप कॉमेडी साठी होते. त्यात भगवंत मान यांनी उपविजेता पद पटकावले.
त्यांचा कॉमेडी सेन्स फार छान असे. त्यांनी सुरुवातीला जेव्हा त्यांचा राजकारणाशी संबंध नव्हता त्यावेळेस त्यांनी ऐक राजकारणावर आधारित जोक फार प्रसिद्ध असत.जुगणु मस्त या विडिओ कॉमेडी शो चे ते विजेते होते.
राजकीय प्रवास-
फक्त 15 वर्ष्याच्या कालावधी मध्ये 2 मुख्यमंत्री देणे म्हणजे भारतीय राजकारणात ऐक अपूर्व पूर्ण गोष्ट होती. ती आप ने पूर्ण केली
2012 पासून पंजाबच्या पीपल्स पार्टितुन त्यांनी निवडणूक लढविली पन त्यात ते अपयशी ठरले.
2014 सालापासून ते आप पक्षा सोबत काम करत आहेत.संगरुर या मतदार संघातून त्यांनी तब्बल 2 लाख मताद्वारे विरोधी मातबरना धूळ चालवली.आणि तेव्हापासून ते पंजाब आप चा चेहरा बनले.2017 साली 300 हुन अधिक रॅली काढून त्यांनी आपल्या परिश्रमाचा ठसा उमटविला.तेव्हा पासून त्यांनी पूर्ण वर्तवणूक बदलली.2019 पासून त्यांनी भष्ट्राचार मुक्ती चा नारा दिला.
वयक्तिक जीवन-
भगवंत मान यांचा 2014 साली घटस्फोट झाला आणि पत्नी पासून ते विभक्त झाले. त्यांना 1 मुलगा आणि 1 मुलगी असे दोन मुले असून ते अमेरिकेत वास्तव्यास आहेत.
काही खासदारांनी भगवंत मान दारूच्या नशेत गेले आहेत असं आढळून आलं आणि ते त्यांना उपहासात्मक पेगवन्त मान अस म्हणत. त्यांचे वडील शिक्षक होते म्हणून की काय त्यांना मेहनतीची महती चांगलीच माहिती होती.
मेहनतीची फाळ-
आम आदमी पक्ष म्हणजे अरविंद केजरीवाल हे समीकरण भगवंत माण यांनी बदलले असून आप ला आता आणखी ऐक नवीन चेहरा मिळाला आहे. धुरी या मतदार संघातून त्यांनी मुख्यमंत्री पदाची विजयी पताका रोवली . महिला आणि तरुण मुले यावर त्यांनी आपली छाप पाडली.
भगवंत मान यांच्या यशाची कारणे
19 जानेवारी 2022 रोजी पंजाब च्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून आम आदमी पक्षाने त्यांना लोकांसमोर उभे केले. जवळपास 21 लाख लोकांना टेलिफोनिक इंटरव्यू द्वारे संवाद साधला आणि जनतेला विविध आश्वासने दिली. मागील पक्षातील आणि आपल्यातील फरक त्यांनी सांगितला. पूर्ण बदल म्हणजेच आज पर्यंत आलेली सत्ता आणि आपली सत्ता कशी वेगळी असेल हे त्यांनी लोकांना समजून सांगितले. “इस बार न खायेंगे धोका भगवंत मान और केजरीवाल नू देंगे मोका” असे स्लोगन त्यांनी दिले.केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये कसे बदल केले आणि दिल्ली मॉडेलचा काय परिणाम झाला तसे बद्दल आपल्या पंजाब मध्ये करू असे जनतेला आश्वासन दिले.
युथ आणि वुमन यांचा सपोर्ट घेऊन त्यांनी त्यांच्या मध्ये लोकप्रियता मिळवली. महिलांच्या अकाऊंटमध्ये हजार रुपये टाकू असे आश्वासन दिले पंजाब मध्ये त्यांनी फार्म एज्युकेशन नावाची कन्सेप्ट तयार केली. ती जवळपास एक वर्ष चालली त्यामुळे आप या पक्षाला आणखीन लोकप्रियता मिळाली.
लेखक
– वैभव रूद्रवार