आकाशगंगेतून येणाऱ्या आगळ्यावेगळ्या आवाजाचे रहस्य !

नासाची सध्या चर्चेत असलेली बातमी म्हणजे आकाशगंगेतील आगळ्या वेगळ्या आवाजाची.

होय, आजवर अनेक वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अंतराळात पूर्णपणे निर्वात पोकळी म्हणजेच व्हॅक्युम असल्याने तिथे उपकरणांशिवाय कोणताही आवाज ऐकू येणे कठीण असते. मात्र सध्या नासाने शेअर केलेल्या एका व्हिडिओने हा आजवरचा अभ्यास चुकीचा असल्याची शक्यता निर्माण केली आहे. अमेरिकन अंतराळ शोध संस्था नासाने ट्विटरवर शेअर केलेल्या काही सेकंदांच्या क्लिपमध्ये घर्षणाचा अत्यंत विचित्र आवाज ऐकू येत आहे.

 

वैज्ञानिकांच्या माहितीनुसार अंतराळात अनेकदा अनेक वायूंच्या घर्षणाने असे आवाज तयार होत असतात मात्र हा आवाज वायूंचा नसून ब्लॅक होल किंवा अन्य आकाशगंगेतील असल्याचे नासा कडून सांगण्यात येत आहे. नासाच्या अधिकृत अकाउंट वरून दिलेल्या माहितीनुसार, वास्तविक अंतराळाच्या निर्वात पोकळीत, ध्वनी लहरी वाहून नेण्यासाठी मार्ग उपलब्ध नसतो परिणामी कोणताही आवाज दूरपर्यंत पोहचू शकत नाही. मात्र अन्य आकाशगंगा क्लस्टरमध्ये इतका वायू आहे की ज्यामुळे हा आवाज पकडणे शक्य झाले आहे.  त्यामुळे काही सोशल मीडियावरून वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्हीदेखील हा भयावह आवाज ऐकला असेल.

 

या अंतराळातील आवाजाची तीव्रता जरी कमी असली तरी, वास्तविक अंतराळातील ध्वनी, मानवी श्रवण श्रेणीच्या बाहेर असते. नासाने शेअर केलेल्या या क्लिप मधील आवाज मूळ वारंवारतेपेक्षा १४४ चतुर्भुज आणि २८८ चतुर्भुज पट जास्त करून मानवी श्रेणीच्या कक्षेत आणण्यात आला आहे.

 

नासा काय म्हणतो ?

नासाने वायरल केलेल्या या बातमीनुसार बहुचर्चीत झालेला हा आवाज मात्र अनेकांनी कुतूहलाने ऐकला देखील असेलच. खरंतर नासाच्या माहितीनुसार, हा आवाज ब्लॅक होल सारख्या पर्सियस आकाशगंगेतील क्लस्टरमधील आहे. सुमारे १.१ कोटी प्रकाशवर्षांइतकी या आकाशगंगेची कक्षा आहे. आपल्या आकाशगंगेच्या अंतराळातील निर्वात पोकळीपासून ही आकाशगंगा दूर अंतरावर आहे व त्याच्या अवतीभोवती उष्ण वायू आहेत ज्यामुळे ध्वनिलहरी प्रवास करू शकतात. अर्थात या स्पष्टीकरणावरून हि आवाजाची क्लिप नैसर्गिक असल्याचे जरी सिद्ध होत असले तरी हा आक्रोशासारखा भासणारा आवाज अंगावर काटा आणेल असा आहे. त्यामुळे अंतराळातून आवाजाची अनोखी आणि आगळीवेगळी गोष्ट या आवाजाने आकर्षित केलेली आहे.

Editorial Team: Editorial Team By MarathiShout Publication
Recent Posts