सध्या एक सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक पेशंट वेगळ्याच समस्याला सामोरे जात असल्याचे दिसून येत आहे. व्हायरल झालेला तो व्हिडिओ मध्यप्रदेश मधील छिंदवाडा मधील असून त्या व्हिडिओ मधील पेशंट पंख्याबद्दल तक्रार करताना दिसून येत आहे.
सध्या राज्यात व देशभरात सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दिसून येत आहे. या दुसऱ्या लाटेत कोरोना ग्रस्तांचे प्रमाण खूपच वाढले असून लोकांना ऑक्सिजन बेड मिळत नाहीत. ऑक्सिजन बेड मिळावा यासाठी पेशंटच्या नातेवाईकांना अनेक हॉस्पिटल्स ना संपर्क साधावा लागत आहे. तरीही अनेकांना प्रतीक्षेत ठेवण्यात येत आहे.
काय सांगणे आहे या रुग्णाचे?
स्वतःच्या मोबाईल मधून व्हिडिओ शूट करून त्याच्या वरी लावलेल्या फॅन हा जोराने हलत असल्याचे सांगत आहे. “माझ्या बेडच्या वरी एक विदेशी फॅन लावला असून ज्याला पाहूनच भीती वाटत आहे. कोरोनाची भीती वाटत नाही, पण फॅनची वाटत आहे. हा पंखा रात्रभर झोपू देत नाही. आता पडेल, नंतर पडे अशी भीती मनात वाटते.” असे तो मुलगा व्हिडिओ मध्ये म्हणत आहे.
पुढे तो म्हणाला “मी स्टाफ ला म्हटलं आहे पंखा तरी चेंज करा अथवा माझा बेड तरी चेंज करा. पण ते म्हणत आहे हे आमचे काम नाही. कोरोनाच्या अगोदर मला हा पंखाच संपविणार असे दिसत आहे. पंखा बदलायचा की बेड बदलायचा की सरकार बदलायच हे तुम्हीच सांगा.” हा व्हिडिओ सध्या खूपच जास्त व्हायरल होत असून या मुलाबद्दल दुःख वाटून घ्यावं की याच्याबद्दल हसावे हाच लोकांना प्रश्न पडला आहे.
कोरोना नी कसे आपल्या आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहे, हे या व्हिडिओ तून आणखीनच स्पष्ट होते. रुग्णाला औषध, ऑक्सजन नाही ही बाब मान्य पण सध्या सोयही उपलब्ध नाहीत हे आपल्या देशाचे दुर्दैवच.