अबब..! ‘ब्रह्मास्त्र’ झपाट्याने करतोय कोट्यावधींची कमाई. केलाय करोडोंचा आकडा पार. जाणुन घ्या आजची कमाई!

सध्या जोमाने चर्चेत असलेला आणि आलिया रणवीरच्या चात्यांनी अगदी डोक्यावर घेतलेला सिनेमा म्हणजे ‘ब्रह्मास्त्र’. खरंतर हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता होती. शेवटी हा चित्रपट 9 सप्टेंबरला रिलीज झाला आहे. चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अशातच चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. 

 

‘ब्रह्मास्त्र’ हा बहुचर्चित चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवशीही कमाईचा वेग वाढलेला दिसून आला. मीडिया रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी या चित्रपटाने जागतिक पातळीवर 75 कोटींची कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडीत काढले होते. यानंतर चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही चांगली कमाई करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

 

ब्रह्मास्त्र बॉक्स ऑफिसने नवी क्रांती आणली आहे. पहिल्या दिवशी ‘ब्रह्मास्त्र’ चे १३ हजारहून अधिक शो सिनेमागृहांमध्ये झाले आणि तिकीटांचीही जोरदार विक्री झाली. ब्रह्मास्त्र सुमारे ३००-३५० कोटींच्या बजेटमध्ये बनले आहे. याचा खुलासा खुद्द अयान मुखर्जीने एका मुलाखतीत केला आहे. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत जगभरातील बाजारात 160 कोटींचा टप्पा पार केला. चित्रपटाचे यश पाहून आलिया आणि अयान मुखर्जीनेही चाहत्यांचे आभार मानले. 

 

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’साठी चाहत्यांच्या क्रेझचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, रात्री २:३० वाजताही या चित्रपटाचे खास शो लोकांच्या मागणीनुसार चालवले जात आहेत. खुद्द आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही माहिती दिली आहे. बहिष्काराचा ट्रेंड असूनही, रणबीर आणि आलियाच्या ब्रह्मास्त्रने तीन दिवसांच्या कमाईच्या बाबतीत दहशत निर्माण केली आहे. हा चित्रपट चांगला व्यवसाय करत असून प्रेक्षकांची प्रशंसाही करत आहे.

 

या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी 32 कोटींची कमाई केली होती. तर चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 37 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच चित्रपटाने ओपनिंग डे पेक्षाही जास्त कमाई केल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना चित्रपट रटाळवाना वाटत आहे तर काहींना यामध्ये थ्रिल दिसून येत आहे. नकारात्मक प्रतिक्रिया मिळूनसुद्धा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन वाढत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या काही दिवसातच या चित्रपटाने २२५ कोटींचा आकडा पार केलाय. 

 

हा ब्रह्मास्त्रचा पहिला भाग आहे. ‘ब्रह्मास्त्र’ च्या पहिल्या भागाचं नाव ‘ब्रह्मास्त्र भाग १- शिवा’ असं आहे. तर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं नाव ‘ब्रह्मास्त्र भाग २- देव’ असं आहे. चित्रपटाचा पहिला भाग हा शिवा (रणबीर कपूर ) नावाच्या मुलावर अर्थातच आधारित आहे.त्याच्याकडे काही दैवी शक्ती असतात. त्याच्याकडे एक ‘अस्त्र’ असतं. त्या शक्तीच्या आधारे त्याला पृथ्वीवर येणाऱ्या संकटाची चाहूल आधीच लागते. तो या शक्तीच्या आधारे या जगाचं संरक्षण करण्यासाठी आणि आपल्यामध्ये दडलेल्या शक्तीचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतो. ब्रह्मास्त्रच्या पहिल्या भागाचा शेवट फारच रंजक आहे. कारण यामध्ये दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा केलेली आहे.

 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts