भिनेत्री शिल्‍पा शेट्‍टी, राज कुंद्राच्‍या यांच्या अडचणीत पुन्‍हा वाढ , कोट्यवधी रुपयांची फसवणूक चा आरोप

बॉलीवूड अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टी आणि तिचा पती राज कुंद्रा ( Shilpa Shetty & Raj Kundra ) यांच्‍या अडचणीत पुन्‍हा एकदा वाढ झाली दिसत  आहे.

याआधी  राज कुंद्रावरपॉर्न व्‍हिडिओप्रकरणी कारवाई सुरु होती मात्र आता  शिल्‍पा शेट्‍टी आणि राज कुंद्रा (Shilpa Shetty & Raj Kundra ) या दोघांच्या  विरोधात मुंबईच्या  बांद्रा पोलिस ठाणे  इथे आर्थिक फसवणुकीचा गुन्‍हा दाखल झाला आहे.

 

मीडिया रिर्पाटनुसार, या प्रकरणी व्‍यावसायिक नितीन बराई यांनी ही  तक्रार केली असून, २०१४ पासून आर्थिक फसवणूक झाल्याचं त्‍यांनी म्‍हटलं आहे. शिल्‍पा शेट्‍टी, राज कुंद्रा आणि अन्‍य आरोपींवर ४०६, ४०९, ४२०, ५०६, ३४ आणि १२० (ब) कलमान्‍वये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. लवकरच पोलिस  या प्रकरणातील संशयित शिल्‍पा शेट्‍टी आणि राज कुंद्रा यांची चाैकशी करतील अशी माहिती मिळत आहे. 

Shilpa Shetty आणि Raj Kundra ने केली  १ कोटी ५९ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक ?

 

बराई यांनी आपल्‍या तक्रारीत असे म्‍हटलं  की, शिल्‍पा शेट्‍टी आणि राज कुंद्रा यांना स्‍पा आणि जिम सेंटरची शाखा पुणे येथील कोरेगाव येथे सुरु करायची होती. याकरिता त्‍यांनी माझ्‍याशी संपर्क केला सुरवातीला  या व्‍यवसायात मोठा फायदा असल्‍याचे मला सांगितले. यावर विश्‍वास ठेवून मी १ कोटी ५९ लाख २७ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र या पैशाचा वापर व्‍यवसायाऐवजी संशयित आरोपींनी स्‍वत:च्‍या फायदयासाठी केला. तसेच पैसे परत देण्‍याची मागणी केल्‍यानंतर त्यानीं धमकी दिल्‍याचेही आरोप  त्‍यांनी तक्रारीत म्नोंदवले आहे.

 

राज कुंद्राचवर पोंर्न चित्रपट संबंधी केस सुरू आहे आता ही नवीन बातमी आल्याने राज आणि शिल्पा चांगलेच अडचणी सापडलेले दिसत आहे. 

 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts