नक्षल्यांच्या भ्याड हल्ला, २२ जवान शहीद.!

सुकमा: छत्तीसगडच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांनी जवानांना वेढा घालून भीषण हल्ला केला आहे. यात २२ जवान शहीद झाले आहेत. हिडमाच्या सुरक्षेत नक्षलवाद्यांची सर्वात घातक टीम असते. ही टीम अत्याधुनिक हत्यारांनी सज्ज असते. या टीममध्ये जवळपास ८०० नक्षलवादी होते. त्यांनी आमच्यावर डोंगरांवरून हल्ला केला, असं चकमकीतील एका जवानाने सांगितलं. हिडमा ही छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात आश्रय घेत असते. घटनेचे स्थळ हे तेलंगणला लागून आहे.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आता २४ जवान शहीद झाल्याची ( sukma attack ) माहिती आहे. कुख्यात नक्षली हिडमा याला पकडण्यासाठी जवान नक्षलवाद्यांच्या गड जंगल भागात घुसले होते. २००० जवाना यात सहभागी होते. जवानांच्या वेळवेगळ्या टीम यात करण्यात आल्या होता. नक्षलवाद्यांनी जवानांना घनदाट जंगलात घुसू दिलं. त्यानंतर त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला.


सुरक्षा दलांच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या होत्या. या पैकी एक टीम कुख्यात नक्षलवादी हिडमाच्या याच्या बटालियनच्या घातक हल्ल्यात सापडली. यानंतर जवानांना वेढा घालून गोळीबार करत जोरदार हल्ला केला. हिडमाच्या बटालियनने जवानांना तीन बाजूंनी वेढलं होतं. जवान दाट जंगला अडकले होते. आणि डोंगरांवर लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांचावर हल्ला केला.
रॉकेट लाँचरसह एके-४७ ने हिडमाच्या बटालियनने जवानांवर केला हल्ला

हिडमासोबत असलेल्या अनेक नक्षलवाद्यांकडे अनेक अत्याधुनिक हत्यार आहेत. अनेक राज्यांचे पोलिस हिडमाच्या शोधात आहेत. तरीही ती तावडीत येत नाहीए. त्यांनी जवानांवर रॉकेट लाँचरने हल्ला केला. यूबीजीएल, रॉकेट लाँचर, आणि इन्साससह एके-४७ रायफलींनी नक्षलवाद्यांनी वेढा घालून १०० ते २०० मीटर अंतरावरून गोळीबार करत होते, अशी माहिती जखमी जवानाने दिली.


पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त.

नक्षलवाद्यांविरोधातील मोहीमेत जवान शहीद झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. जवानांची बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही आणि ते विसरणारही नाही. माझ्या सहवेदना छत्तीसगडमध्ये शहीद झालेल्या जावानांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. शहीद जवानांचा पराक्रम विसरणार नाही. जखमी जवान लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts