चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक जाणून घ्या सत्य !

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आजही अख्खं जग त्रासून गेले आहे. संपूर्ण युरोपसहीत चीनमध्येही करोनाच्या संसर्गाची लाट पुन्हा एकदा आलीय. ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटमुळे चीनमध्ये पुन्हा एकदा करोना झपाट्याने पसरतोय. याच पार्श्वभूमीवर चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आलीय. करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत आर्थिक घडामोडींचं देशातील सर्वात महत्वाचं केंद्र असणाऱ्या शांघाईमध्येही सेमी लॉकडाउन जारी करण्यात आलाय. करोनाच्या या नव्या लाटेचा फटका अर्थव्यवस्थेचा बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच अर्थव्यस्थेचा गाडा सुरळीत सुरु ठेवण्यास हातभार लावण्यासाठी अनेक ठिकाणी कंपन्यांमध्येच कर्मचारी राहत असल्याचं चित्र दिसत आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय केलीय.

 

कुठे घडतंय?

 

शांघाईमधील लुजियाझुई येथे जवळवजळ २० हजार कर्मचारी, बँकर्स आणि व्यापारी त्यांच्या कार्यालयांमध्येच वास्तव्यास आहे. कंपनीमध्ये दिवसभर काम करुन नंतर लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये बाहेर पडता येत नसल्याने या कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय कंपन्यांनी कामाच्या जागीच करुन दिलीय. हजारोंच्या संख्येने स्लीपिंग बॅग मागवण्यात आल्यात. या कर्मचाऱ्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आलीय.

 

रुग्णांची संख्या किती ?

 

मंगळवारी चीनमध्ये करोनाचे ४ हजार ४७७ रुग्ण आढळून आले होते. त्यामुळेच लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका चीनच्या अर्थव्यवस्थेला हळूहळू बसू लागलाय. म्हणूनच आता कर्मचाऱ्यांना काम करता येईल अशा सर्व सोयी कामाच्या जागीच उपलब्ध करुन देण्यासाठी कंपन्या आणि सरकारी यंत्रणांचं प्राधान्य आहे.

 

कशी आहे नियमावली?

 

एकीकडे चीनकडून करोनाचा फैलाव रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली जात असताना दुसरीकडे याचा अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामावरुन टीका केली जात असल्याचं एपीने दिलेल्या वृत्तात म्हटलेलं. शांघाईमधील पुडाँग हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचा भाग असून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर सोमवार ते शुक्रवार लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रशासनाने यासंबंधी माहिती दिली आहे. नागरिकांना घरातच थांबावं लागणार असून इतरांशी संपर्क होऊ नये यासाठी सामान चेक पॉइंटवर ठेवलं जाणार आहे. अत्यावश्यक नसणारी कार्यालयं आणि सर्व व्यवसाय बंद राहतील. तसंच सार्वजनिक वाहतूक बंद केली जाणार आहे, असं प्रशासनाने स्पष्ट केलंय.

 

आधीच लागू करण्यात आलेत निर्बंध

याआधीच चीनमध्ये २.५ कोटींहून जास्त लोकांना लॉकडाउनध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना करोनासाठी अनेक चाचण्या कराव्या लागत आहेत.

 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts