मार्केट, दुकाने बंद हाच एकमात्र कोरोणावरील उपाय आहे का?

नागपूर:- कोरोना काळात अनेक लोक आपल्या दोन वेळेच्या जेवनासाठीही संघर्ष करीत आहेत, त्यातच आता रोज नवीन येणाऱ्या नियमावली व्यापारी वर्गाला धंदा बुडवायला लावणारी आहे. आजच्या घडीला कोरोनाच्या साथीमुळे जिम, सलून, ग्राहपयोगी दुकाने,आणि त्यातल्या त्यात सभागृह, लॉन व्यवसाय बंद आहे. छोटे खाण्याचे स्टॉल्स ही गर्दी होत असल्याने बंद करण्यात येत आहेत. गेल्या एक वर्षापासून असेच सुरू आहे त्यामुळे हा सवाल व्यापारी आणि दुकानदार संघ मांडत आहे.
करोनाबाधितांची साखळी तोडण्यासाठी व्यापारबंद हा एकमेव उपाय आहे का, अशी विचारणा करणारे पत्र अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघाने (कॅट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.


करोनाचे वाढते रुग्ण पाहता प्रतिबंधात्मक उपायांची निश्चितच गरज आहे. मात्र, करोनाबाधितांची साखळी तोडण्यासाठी व्यापारबंद हा एकमेव उपाय आहे का, अशी विचारणा करणारे पत्र अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघाने (कॅट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

एप्रिल महिना हा नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीचा महिना आहे. दरवर्षी हा महिना व्यापाऱ्यांच्या दृष्टीने कठीण जातो. २० एप्रिलपूर्वी जीएसटी भरावा लागतो. करविषयक विविध बाबींची पूर्तता या महिन्यात होत असते. नवीन आर्थिक वर्षाचे नवीन वहिखाते सुरू होते. त्याचप्रमाणे या महिन्यात धार्मिक उत्सवांचे प्रमाण मोठे आहे. रामनवमी, गुढीपाडवा, आंबेडकरजयंती,चेट्रीचंड उत्सव, महावीर जयंती, हनुमान जयंती आदी उत्सव आता येणार आहेत. लग्नाचा मौसम आहे. त्यामुळे बाजारात होणारी उलाढाल व्यापारबंदच्या निर्णयामुळे पूर्णत: प्रभावित होणार आहे. या काळात होणारी व्यावसायिक उलाढाल पुढे दिवाळीपर्यंत कामी येते. परंतु, आता आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच व्यापारबंदमुळे नवीन संकट उभे राहणार आहे.


वीस दिवसांहून अधिकचा काळ दुकानदारी बंद राहणार आहे. अशा स्थितीत नोकरदारांचे वेतन कसे द्यावे, गाळ्यांचे भाडे, विज बिल, कर भरणा आदी समस्यांचा सामना करावा लागणार आहे. मागील वर्षी झालेले नुकसान अद्याप भरून निघालेले नाही. बंदमुळे संपूर्ण माल गोदामात, दुकानात पडून राहणार आहे. आपल्याकडील कारखाने हे औद्योगिक वसाहतींमध्ये आहे. मात्र, कारखान्यांचे कार्यालय शहरी भागात आहेत. अशा प्रकारातील खासगी कार्यालये बंद राहिल्यास ई वे बिल, टॅक्स इनव्हॉइस, अकांउंटिंगची कामे कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दैनंदिन स्वरुपाची ही कार्ये वर्क फ्रॉम होम अंतर्गत होऊ शकत नाही, याकडे कॅटने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

आता व्यापारीसंघटना राज्यव्यापी बैठकीतून काढानार तोडगा

राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख्य व्यापारी संघटनांची बैठक बोलाविण्यात यावी. त्यामध्ये पूर्णपणे व्यापारबंद न करता मधला मार्ग काढण्यावर भर देण्यात यावा. बाजारपेठा, दुकानांची स्वच्छता आणि सॅनिटायजेशनवर अधिकाधिक भर द्यायला हवा, असे कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया यांनी पत्राच्या माध्यमातून सुचविले आहे.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts