कोरोना : वाशिममध्ये 229 शालेय विद्यार्थ्यांना संसर्ग, तसेच सोलापूर व साताऱ्यातही काही विद्यार्थी पॉझिटिव्ह.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या साततत्याने वाढ होत आहे त्यामुळे प्रशासन आणि पालकांसमोर एक नवं आव्हान उभं राहिलं आहे. राज्यातील ग्रामीण भागांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचं चित्र समोर आलं आहे.

वाशिम जिल्ह्यातील निवासी शाळेत 229 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले आहे तसेच सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातही काही शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे

सोलापूर जिल्ह्यात 42 विद्यार्थी आणि 8 शालेय कर्मचारी अशी एकूण 50 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे तसेच सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील शाळेत 23 विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याची बातमी समोर येत आहे .



पश्चिम विदर्भा भागातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याच्या देगाव निवासी शाळेत 229 विद्यार्थी तसेच 4 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गेल्या 2 दिवसात कोव्हिड-19 पॅाझिटिव्ह आढळून आलीच बातमी आहे .

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी देगाव निवासी शाळेला भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतलाय.
विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रकृतीवर लक्ष ठरवण्यासाठी दोन डॉक्टरांसह आरोग्य पथकं तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जे विद्यार्थी कोरोनाबाधित आहेत. त्यानां मात्र कोणालाच कोरोनाची लक्षणं नव्हती अशे समोर आले . ही मुलं 14 ते 17 या वयोगटातील आहेत मुलांची प्रकृती चांगली आहे.



संसर्ग कसा पसरला?

10 दिवसांपूर्वी देगावच्या निवासी शाळेतील 30 मुलं पॅाझिटिव्ह आढळून आली होती. त्यानंतर शाळेत संसर्ग पसरल्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तवली आहे.

जिला प्रशासनाच्या माहितीनुसार 14 फेब्रुवारीपासून कोरोनाचा विविध जिल्ह्यात संसर्ग पसरल्याचं आढळून आलेत त्यानंतर शाळेतील मुलांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. 100 टक्के विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली  त्यासाठी  आरोग्य विभागाची एक टीम दिवसरात्र या शाळेत ठेवण्यात आली  !

साताऱ्या जिल्ह्यातील 23 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण !

सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील शाळेतील 23 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या सेवागिरी विद्यालयात आरटीपीसीआर चाचणी दरम्यान 23 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. यामुळे शाळा पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोलापुरातील शाळेत 50 जणांना कोरोना

दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावातील मतिमंद विद्यार्थ्यांच्या जिव्हाळा शेतकी कर्म शाळेतील 42 विद्यार्थी आणि 8 शिक्षक कर्मचारी अशा एकूण 50 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दिव्यांग, मतिमंद मुलांना या शाळेत शेती तसेच अन्य प्रशिक्षण दिलं जातं. 12 तारखेला या शाळेतील काही शिक्षकांना त्रास होऊ लागल्यानंतर सर्व शिक्षक आणि कर्मचारी तसंच विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली  होती .

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts