महाराष्ट्रात डबल म्युटेशन असलेला करोनाचा नवीन प्रकार ? जाणून घ्या सविस्तर !

महाराष्ट्रात करोनाचे दोन नवीन प्रकार ( new covid strain ) आढळून आले आहेत. महाराष्ट्रात E484Q आणि L452R हे दोन करोनाचे प्रकार आढळले आहेत. महाराष्ट्रातील १५ ते २० टक्के रुग्णांमध्ये करोनाचा हे नवीन प्रकार आढळले आहेत. एवढचं नव्हे तर महाराष्ट्रात डबल म्युटेशन असलेला करोनाचा नवीन प्रकार आढळला आहे. यामुळे धोका वाढला आहे.

केरळमध्येही करोनाचा नवीन प्रकार आढळला आहे. केरळमध्ये करोनाचा N440K हा प्रकार आढळला आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांमधून २०३२ नमुने घेतले गेले. यात ११ जिल्ह्यांमध्ये १२३ नमुने हे करोनाच्या नवीन प्रकाराचे आढळून आले. केरळमधील करोनाच्या N440K या नवीन प्रकाराचे आंध प्रदेशात ३३ टक्के नमुने आढळून आले होते. तर करोनाच्या याच नवीन प्रकारचे ५३ टक्के नमुने हे तेलंगणमध्ये आढळून आले. N440K हा करोनाचा नवीन प्रकार १६ देशांमध्ये आढळून आला आहे. पण काही राज्यांमधील वाढत्या करोना रुग्णंसंख्येशी याचा थेट कुठलाही संबंध नाही.

महाराष्ट्रातील नमुन्यांच्या अभ्यासानंतर डिसेंबर २०२० च्या तुलनेत E484Q आणि L452R या करोनाच्या नवीन प्रकारांमध्ये काहीसा बदल झाल्याचं दिसून आलं आहे. या व्हायरसने संसर्ग अधिक वाढतो. करोनाच्या नवीन प्रकाराचे जवळपास १५ ते २० टक्के नमुने आढळून आले आहेत. हे नमुने आधीच्या कुठल्याही नमुन्याशी मेळ खात नाहीत.

राज्यांमध्ये कोरोना व्हायरस ‘डबल म्यूटेंट’ वेरिएंट आढळला आहे. हा वेरिएंट अधिक संक्रामक असून शरीरातील इम्यून सिस्टीम म्हणजेच रोगप्रतिकारकशक्ती या व्हायरसशी लढण्यासाठी सक्षम असल्याचे सांगितले जात आहे. पण अजूनही कोणतेही पुरावे याबाबत याबाबत मिळालेले नाहीत. व्हायरसचा हा प्रकार संक्रामकता वाढवत असल्याचं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये कमालीची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. देशात कोरोनाचा डबल म्यूटेंट वेरिएंट हल्ला करत असल्याचं दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार १८ राज्यांमध्ये कोरोना व्हायरस ‘डबल म्यूटेंट’ वेरिएंट आढळला आहे. हा वेरिएंट अधिक संक्रामक असून शरीरातील इम्यून सिस्टीम म्हणजेच रोगप्रतिकारकशक्ती या व्हायरसशी लढण्यासाठी सक्षम असल्याचे सांगितले जात आहे. पण अजूनही कोणतेही पुरावे याबाबत याबाबत मिळालेले नाहीत. व्हायरसचा हा प्रकार संक्रामकता वाढवत असल्याचं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अन्य राज्यातील परीस्थिती:
सरकारने अशी माहिती दिली आहे की देशात कोरोनाची अशी 771 प्रकरणे आहेत, ती नवीन स्ट्रेनशी संबंधित आहेत. यामध्ये यूकेच्या कोरोना व्हेरिएंटची 736 प्रकरणे, दक्षिण आफ्रिकन प्रकारातील 34 प्रकरणे आणि ब्राझिलियन व्हेरियंटमधील एक प्रकरणांचा समावेश आहे. महाराष्ट्र, केरळ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही कोरोनाचे नवीन स्ट्रेन सापडले आहेत.


खरं तर, आरोग्य मंत्रालयाने १० राष्ट्रीय प्रयोगशाळांचा एक गट तयार केला होता, जी कोरोनाच्या वेगवेगळ्या जिनोम-सीक्वेन्सिंगवर परिक्षण करीत आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, केरळमधील सर्व 14 जिल्ह्यांमधून 2032 नमुन्यांची जीनोम्सचे परिक्षण करण्यात आले असून यापैकी 11 जिल्ह्यांतील 123 नमुन्यांचा लोकांच्या प्रतिकारशक्तीवर कोणताही परिणाम झाला नाही.शिवाय आंध्र प्रदेशातील एकूण नमुन्यांपैकी 33 टक्के असे आहेत, तर तेलंगणात 104 पैकी 53 नमुन्यांमध्ये नवीन स्ट्रेन आढळले आहेत. कोरोनाचा हा नवीन प्रकार ब्रिटन, डेन्मार्क, सिंगापूर, जपान आणि ऑस्ट्रेलियासह जगातील अन्य 16 देशांमध्येही आढळला आहे. आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की या नवीन प्रकारामुळे भारतात संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत आहे, हे समजण्यासाठी अजून संशोधन आवश्यक आहे.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts