रोजच कोरोनाची वाढती रुग्णसंख्येच्या भीतीने सामान्य नागपूरकर घाबरला आहे परंतु त्यात आता नागपूर रेल्वे प्रशासन ही कोरोनापुढे नमले आहे. नागपूर रेल्वे स्थानक इथून संपूर्ण भारतात आपण पोहचू शकतो तसेच अनेक रेल्वे गाड्यांचे थांबा हे नागपूर आल्याने भारतभरातून प्रवाशी ये जा करतांना दिसतात. त्यातच आतारेल्वेच्या विविध विभागांमध्ये करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रेल्वे प्रशासन खबरदारीच्या सर्व उपाययोजना करीत असले तरी बाधितांची संख्या वाढल्याने प्रशासन चिंतेत आहे.
नागपूर रेल्वे स्थानकातील रुग्ण वाढ चिंताजनक:
रेल्वे सुरक्षा दलात पुन्हा तीन बाधित आढळले. संबंधित जवान राहात असलेली अजनी येथील खोली प्रतिबंधित करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाच्या राखीव दलात १३ आरपीएफ जवान बाधित निघाल्यामुळे खळबळ उडाली होती. आता आरपीएफ ठाणे, गुन्हे शाखा आणि बल्लारशा येथील प्रत्येकी एक जवान पॉझिटिव्ह निघाले आहेत. यातील १२ जण बरे झाले असून, चार जवानांवर उपचार सुरू आहेत. परंतु आता राखीव दल सोडून इतर विभागातील जवान करोनाबाधित निघाल्यामुळे आरपीएफ जवानांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बाधित असलेल्या जवानांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. तर त्यांच्या संपर्कातील इतरांना होम क्वारंटाइन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
यासोबतच रेल्वे रुग्णालयात पहिल्या दिवशी एक परिचारिका, दोन दिवसांनी पुन्हा एक, नंतर दोन सहायक, असे एकूण चार कर्मचारी बाधित असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कातील तीन कर्मचारी गृह विलगीकरणात आहेत. रुग्णालयात भीतीचे वातावरण असल्याने बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची संख्या रोडावली आहे. केवळ नियमित रुग्ण औषधोपचारांसाठी येत असल्याचे बोलले जाते.
रेल्वे पोलीस यांना सुद्धा कोरोना ने ग्रासले:
आरपीएफ पथकात आतापर्यंत १६ जवान बाधित असल्याचा अहवाल आहे. बाधित जवानांपैकी १२ जण बरे झाले असून, चार जवानांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कातील इतरांचा शोध घेण्यात येत असून, गरज भासल्यास त्यांना होम क्वारंटाइन करण्यात येत आहे, असे मध्य रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी सांगितले.