ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनका लसीचे समोर आले दुष्परिणाम !

ब्रिटनच्या मेडिसिन अॅण्ड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने सांगितले की, २४ मार्चपर्यंत लस घेतल्यानंतर रक्ताची गाठ तयार झाल्याचे ३० प्रकरणे समोर आली. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये १.८१ कोटी डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी ३० प्रकरणे समोर आली आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या डेटानुसार लशीचे फायदे अधिक असून नुकसान कमी आहे. त्यामुळे लशीचा वापर सुरूच ठेवला पाहिजे असेही अधिकाऱ्याने म्हटले.


अनेक रुग्णांना एस्ट्राजेनका घेतल्यामुळे झाल्या रक्ताच्या गाठी:
लस आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याचा काही संबंध आहे का, याचाही शोध घेतला जात असल्याचे प्राधिकरणाने सांगितले. तर, फायजर-बायोएनटेक लशीबाबत असे कोणतेही वृत्त समोर आले नाही.करोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण सुरू आहे. या लसीकरण मोहिमेत ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाच्या लशीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असताना चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

एस्ट्राजेनकाची लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी झाल्याने सात जणांना प्राण गमवावे लागले असल्याची माहिती ब्रिटनच्या वैद्यकीय प्राधिकरणाने दिली आहे. युरोपीयन युनियनमधील काही देशांनी याच कारणांमुळे एस्ट्राजेनका लशीचा वापर थांबवला आहे.


मागील महिन्यातच काही युरोपीयन देशांनी एस्ट्राजेनका लशीच्या वापरावर स्थगिती आणली. डेन्मार्क, जर्मनी, ऑस्ट्रिया यांसह युरोपीयन युनियनमधील काही देशांमध्ये एस्ट्राजेनकाची लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी तयार होत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या देशांनी लस वापराला तात्पुरती स्थगिती दिली होती.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts