पाऊस तर आला नाही,पण कोरोनाची चौथी लाट येणार ?

गेल्या २४ तासांत ४२५७ नवीन रुग्ण आढळले आहेत.शनिवारी, १५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची झाली आहे तर २६१२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच सध्या २२ हजार ६९१ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत ४.३१ कोटी लोकांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४.२६ कोटी लोक बरे झाले असून ५.२४ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. या महिन्यात करोनाबाधितांची संख्या ४ हजारांच्या पुढे गेली आहे. २ जून रोजीही देशात ४०४१ लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

महाराष्ट्र, कोरोना रुग्ण संखेत दुसऱ्या क्रमांकावर ?

महाराष्ट्रात पुन्हा एकदा संसर्गाचा वेग वाढला आहे. राज्यात शनिवारी १३५७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ५९५ रुग्ण बरे झाले असून एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. सध्या ५८८८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. करोनाचा वाढता प्रसार पाहता राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केरळचा करोनाबाधिताचा दर ९.८७ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. केरळमध्ये करोनाबाधितांची संख्या अधिक आहे. शनिवारी केरळमध्ये १४५६ नव्याने करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या केरळमध्ये ७४२७ करोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. प्रत्येक १०० चाचण्यांमागे १० करोनाबाधित आढळून येत आहे. CORBEVAX लसीला कोरोना बूस्टर डोस म्हणून मान्यता दिली आहे. १८ वर्षांवरील लोक ज्यांनी कोव्हिशिल्ड (CovaShield ) किंवा कोवॅक्सिन (Covaxin) चे दोन्ही डोस घेतले आहेत ते आता आपत्कालीन परिस्थितीत बूस्टर डोस म्हणून कोर्बेव्हॅक्स( CORBEVAX) घेऊ शकतात.

 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts